परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

गाठीभेटीवर भर!!!!

 भाजपा - राष्ट्रवादी (अजित पवार) युतीची प्रभाग 14 मध्ये प्रचारात आघाडी

सौ. पद्मश्री धर्माधिकारी, प्रा. पवन मुंडे, डॉ. पूजा तोतला यांना मतदारांचा प्रतिसाद

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भाजपा - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) युतीने प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक पदाचे उमेदवार प्रा. पवन मुंडे, डॉ. पुजा तोतला यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध भागात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांनी प्रतिसाद दिला. 

    प्रभाग क्रमांक 14 मधील बाजीप्रभू नगर, घरणीकर कॉलनी, गुरुकृपा नगर आदी ठिकाणी उमेदवारांनी नागरिकांच्या भेटी गाठी घेत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ठिकठिकाणी मतदारांनी उमेदवारांचे स्वागत केले. तुमच्यामुळेच आमच्या विभागाचा विकास झाला असून आगामी काळातही आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत. असा शब्द यावेळी मतदारांनी उमेदवारांना दिला. युतीच्या उमेदवारांनाच प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.

   प्रचार फेरीत उमेदवार प्रा. पवन मुंडे, डॉ. पुजा प्रितेश तोतला यांच्यासह पवन मोदाणी, संजय गर्जे, पवन करवा, पंकज तापडिया, राजेश दाड, आनंद तोष्णीवाल, सचिन गित्ते, रामेश्वर पवार, गणेश भट, नवनाथ मुंडे,नितीन वायचळे, गिरीश मुंदडा,आकाश देशमुख, मधुर कराड,कृष्णा मुंडे, सोमनाथ कांदे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!