परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

आ. नमिता मुंदडा यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी;

अंबाजोगाई नगरपरिषदेसाठी १२ कोटी १३ लाखांचा विक्रमी निधी मंजूर




शहर विकास, दलित वस्ती सुधारणेसह मूलभूत कामांना प्रशासकीय मान्यता


अंबाजोगाई (एमबी न्यूज वृत्त सेवा) :-  केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या सातत्यपूर्ण अंबाजोगाई शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून अंबाजोगाई नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल १२ कोटी १३ लाख १ हजार ७६३ रुपये इतका विक्रमी निधी एकाच वेळी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन विभागाने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी एकाच दिवशी तीन प्रमुख योजनांतील या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. मागील काही वर्षात आ. मुंदडा यांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहर विकासासाठी शासनाने शेकडो कोटी रुपयांचा निधी दिला आहे, त्यात आता आणखी निधीची भर पडली आहे. 


या मंजूर निधीमध्ये महाराष्ट्र नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तरीय), लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना आणि नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजना या तीन महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे.


दलित वस्ती सुधारणांसाठी ६.७१ कोटींचा निधी


लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतून सर्वाधिक ६ कोटी ७१ लाख ६९ हजार ३७८ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांची लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी हा निधी वापरला जाईल. यामध्ये मांडवा रोड, परळी वेस, श्रीराम नगर, अमृतेश्वर नगर, संत ज्ञानेश्वर नगर, क्रांती नगर, फुले नगर, आकाश नगर या भागांमध्ये सिमेंट काँक्रिट (C.C.) रस्त्यांचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक,नाली बांधकाम आणि नाला बांधणीची कामे केली जातील. विशेषतः सिद्धार्थ नगर, पंचशील नगर, साठे नगर आणि वडार वाडा येथे नवीन समाजमंदिरांचे बांधकाम होणार आहे. याशिवाय, लाल नगर येथील स्मशानभूमीमध्ये दहन शेड, वेटिंग शेड आणि शौचालय बांधकाम, संरक्षक भिंत यासारखी अत्यावश्यक कामेही मार्गी लागणार आहेत. या निधीतून प्रभाग ४, ९, १०, ११, १२ आणि १४ मधील बहुसंख्य विकास कामांचा समावेश आहे.   


दलितेत्तर वस्त्यांमध्ये ३.३४ कोटींची कामे


नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेसाठी ३ कोटी ३४ लाख ६९ हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधीतून हिंगलज माता मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, हमाल गल्ली, मोची गल्ली, माळी नगर (श्रीकृष्ण मंदिर), जैन विमलनाथ मंदिर आणि गांधी नगर (प्रभाग क्र. १) यांसारख्या ठिकाणी सभागृह व सभामंडपाचे बांधकाम केले जाईल. कोष्टी गल्ली येथे संरक्षण भिंत व रस्ता करणे आणि प्रभाग क्र.८ मध्ये सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधणे या कामांचाही यात समावेश आहे. नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी, सिंगल सिट कॉईन ऑपरेटेड इलेक्ट्रॉनिक शौचालये अंबाजोगाई शहरात विविध ठिकाणी बसवण्यासाठीही ८२ लाख ५० हजार रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे.


*नगरोत्थान महाभियानातून २.०७ कोटींचे रस्ते*


महाराष्ट्र नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तरीय) अंतर्गत २ कोटी ७ लाख ६३ हजार ३८५ रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यातून धनगर समाजाच्या स्मशानभूमीत सुविधा निर्माण करणे, बडा हनुमान मंदिर उद्यान विकसित करणे, संरक्षण भिंत बांधणे, प्रभाग २, ८ मधील काही रस्ते आणि नाल्या, बोरुळा तलाव स्मशानभूमी विकसित करणे, भोई समाज स्मशानभूमी संरक्षण भिंत, रविवार पेठेतील रस्ते विकास, प्रभाग ६ मधील रस्त्याचे खडीकरण आदी कामेही या निधीतून केली जातील.


आ. नमिता मुंदडा अंबाजोगाई नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन सातत्याने पाठपुरावा करून ही कामे मंजूर करवून घेतली. शहरातील वस्त्यांवरील कामांना प्राधान्य देत, या तीनही योजनांतून मोठा निधी खेचून आणला. त्यांच्या या प्रयत्नामुळे अंबाजोगाई शहरातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांची दुरवस्था, पाणी निचऱ्याची समस्या आणि सार्वजनिक सोयीसुविधांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटला आहे. शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!