परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर आज अर्जांची छाननी सुरू आहे. या छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाईल. पण त्याआधीच राज्य निवडणूक आयोगाने 17 नोव्हेंबरचे पत्र रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
आज उमेदवारी अर्जांची छाननी होत आहे. या छाननीमध्ये अपूर्ण माहिती, कागदपत्रे असलेले अर्ज बाद करण्यात येतील. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना तातडीने पत्र धाडले आहे. या पत्रानुसार नोंदणीकृत पक्षाशी संबंधित नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याबाबतच्या विषयान्वये देण्यात आलेले ता. १७ नोव्हेंबर रोजीचे पत्र रद्द करण्यात येत असून सुधारित सूचना करण्यात येत आहेत.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या वतीने नामनिर्देशन अर्ज सादर केलेल्या डमी उमेदवाराच्या नामनिर्देशन अर्जात एकच सूचक असल्यास छाननी अंती अशा डमी उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात यावा, असे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे एकच सूचक असल्यास असे अर्ज अवैध ठरविले जाणार आहेत.
मात्र, डमी उमेदवाराने पाच सूचकांच्या स्वाक्षरीसह नामनिर्देशन अर्ज सादर केला असल्यास आणि तो डमी उमेदवार इतर कागदपत्रे व अटी शर्तीची पूर्तता करीत असल्यास त्याचा नामनिर्देशन अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून पात्र ठरिवण्यात यावा, असे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा