परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नांवर बैठक उत्साहात!!

 परळीच्या विकासासाठी नगरपालिका लढवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार!




 कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे - प्रा.टी.पी.मुंडे

 नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नांवर  बैठक उत्साहात!!

परळी (प्रतिनिधी) :

परळी नगरपालिका निवडणूक 2025 याच्या पार्श्वभूमीवर तसेच परळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025, बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजता मा. प्रा. श्री. टी.पी. मुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक त्यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाली.

बैठकीत परळी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास आराखडा, नागरिकांच्या दैनंदिन समस्या तसेच शहरातील प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा यासारख्या विषयांवर चर्चा पार पडली.प्रा. मुंडे सरांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडे यांनी मला व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत शब्द दिला आहे. त्याप्रमाणे नगरपालिकेत बारा जागांचा शब्द दिला आहे.प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या प्रभागातील व वार्डातील लोकांच्या अडचणी ऐकून घेऊन सोडवाव्यात. कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहावे असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लोकसभा व विधानसभा या निवडणूकीत आपण महायुतीच्या उमेदवारांना पाठींबा दिला व काम केले. त्या पार्श्वभूमीवर नगर पालिकेत 15 जागा द्याव्यात असा आग्रह उपस्थित कार्यकर्त्यांनी धरला. 

बैठक उत्साही  वातावरणात संपन्न झाली.शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी शहराच्या विकासासाठी अखंडपणे कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.  ज्येष्ठ नेते भीमराव मुंडे, आत्माराम कराड, विनायक गडदे,अँड. संजय जगतकर,सूर्यकांत मुंडे, सलाउद्दीन मामू, रवींद्र (पापा सेठ) गीते, अमन पटेल, रघुनाथ डोळस, जम्मु शेठ, इलियास भाई, सुदाम लोखंडे, गोपीनाथ लोखंडे, गोपाळ तांदळे, नागेश व्हावले, राहुल कांदे,शेख बाबा, शिवा बडे, सोमनाथ आघाव, दीपक फड, पांडुरंग निकते , जगन्नाथ पवार, नूरबानो खाला , मिलिंद क्षीरसागर, चांद भाई, जब्बार भाई,माजेद भाई,रवींद्र सरवदे, फैयाज भाई, शिवा चिखले ,प्रवीण घाडगे,अण्णा सरवदे,आदीसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!