परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
राजेंद्र ओझा यांच्या भगिनी श्रीमती चंद्रकलाबाई ओझा यांचे निधन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र ओझा यांच्या भगिनी श्रीमती चंद्रकलाबाई ओझा यांचे अल्पशा आजाराने आज शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय 87 वर्षे होते.
श्रीमती चंद्रकलाबाई ओझा या धार्मिक वृत्तीच्या आणि मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. मारवाडी समाजात त्यांना अतिशय मानाचे स्थान होते. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या त्यातच आज शुक्रवार दि. 7 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजण्याचे सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कै. चंद्रकलाबाई ओझा यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार दि. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता परळी येथील राजस्थानी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
कै. चंद्रकलाबाई ओझा यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण, दोन भावजई, पुतण्या असा परिवार आहे. वैद्यनाथ बँकेचे कर्मचारी योगेश ओझा यांच्या त्या आत्या होत. ओझा पारावरच्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा