परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
बालासाहेब गिते ( रामा टायर्स) यांच्या भगिनी श्रीमती शिलाबाई यांचे निधन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रामा टायर्सचे मालक बालासाहेब गिते यांच्या मोठ्या भगिनी श्रीमती शिलाबाई मारोती गित्ते यांचे आज दु:खद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 80 वर्षे होते.
श्रीमती शिलाबाई गिते या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. त्या अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. शिलाबाई यांचे आज बुधवारी समर्थ हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज वाघबेट येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी वागबेट व परिसरातील नागरिक उपस्थित होते कै. शिलाबाई गिते यांच्या पश्चात एक भाऊ, भावजई, 5 बहिणी असा मोठा परिवार आहे. नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांच्या त्या मावशी होत.
उद्या राख सावडण्याचा कार्यक्रम
कै. श्रीमती शिलाबाई गिते यांचा राख सावडण्याचा कार्यक्रम उद्या शुक्रवार दि. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता वाघबेट येथे होणार आहे. गिते परिवाराच्या दु:खात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा