परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
दुःखद बातमी: न.प. निवडणुकीतील उमेदवाराचे निधन
गेवराई .. गेवराई नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभाग क्रमांक ११ ‘अ’ च्या अधिकृत उमेदवारी जाहीर झालेल्या श्रीमती दुरदाना बेगम सलीमोद्दीन फारुकी यांच्या अचानक निधनाची बातमी आज सकाळी समोर आली असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर त्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधत होत्या. परंतु अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकस्मात निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
त्यांच्या निधनानंतर निवडणूक प्रक्रियेवर काय परिणाम होणार याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. निवडणूक विभागाच्या वतीने लवकरच अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाण्याची शक्यता असून निवडणूक आयोगाला मार्गदर्शन मागितले असल्याचे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी सांगितले
फारुकी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विविध राजकीय, सामाजिक व्यक्तींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा