इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी म्हणजे काय?

 सेवा परमो धर्मः हे ब्रीद पाळत डॉ. संतोष मुंडे यांच्या प्रयत्नातून आठ लाख रुपयांची कॉकलियर इंप्लांट सर्जरी मोफत




चिमकुल्या मूकबधिर मंगेशला ऐकता व बोलता येऊ लागले

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मंगेश चंद्रकांत लव्हारे रा. पट्टी वडगांव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड हा दोन वर्षाचा छोटा बाळ जन्मतः मूकबधिर होता. त्याच्या पालकांनी माझ्याकडे उपचारांसाठी संपर्क केला. त्यानंतर त्याचे योग्य निदान करून के इ एम रुग्णालयात डॉ. हेतल पटेल यांच्याकडे पाठवले. तिथे चिमुकल्या मंगेशची कॉकलियर इंप्लांट सर्जरी केली. त्याचा खर्च तब्बल 8 लाख रुपये होता.


त्यामुळे विविध एन जी ओ मार्फत निधी उपलब्ध करून मंगेशची मोफत यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यावर आता त्याला ऐकू व बोलता येऊ लागले. या पुण्यकर्मात योगदान देता आले हे मी माझे भाग्य समजतो. या आधी आजवर 70 ते 80 जणांवर हीच कॉकलियर इंप्लांट सर्जरीमध्ये योगदान देता आले याचा आनंद अवर्णनीय आहे. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे व मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा परमो धर्मः हे ब्रीद पाळत मी आजवर काम करत आलो आहे व यापुढेही करत राहणार आहे. मी फक्त माझे कर्तव्य बजावत आहे अशा भावना महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी म्हणजे काय?

कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी म्हणजे गंभीर श्रवणशक्ती कमी असलेल्या व्यक्तींसाठी एक शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये आतील कानाला बायपास करून थेट श्रवण तंत्रिकेला उत्तेजित करणारे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवले जाते. हे उपकरण बाह्य ध्वनींना विद्युत सिग्नलमध्ये रूपांतरित करते, ज्यामुळे मेंदूला आवाज समजण्यास मदत होते, जिथे श्रवणयंत्रे आवाजाची स्पष्टता देऊ शकत नाहीत.

सातत्याने दिव्यांगांसाठी कार्यरत असणाऱ्या डॉ. संतोष मुंडे यांच्या प्रयत्नातून मंगेश लव्हारे याच्यावर झालेल्या यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यामुळे लव्हारे परिवाराने त्यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट