परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 पोलीस हवालदार लाच घेताना रंगेहात पकडला; एसीबीची कारवाई




गेवराई | प्रतिनिधी

कुठलेही टेंडर नसताना खुलेआम सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असतानाच, वाळूमाफियांकडून लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विजय आघाव यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि. ८ नोव्हेंबर) २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.


मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाळू चोरीच्या गुन्ह्यात आरोपी वाळू माफियाला सहकार्य करण्यासाठी हवालदार आघाव यांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती २० हजार रुपयांवर व्यवहार ठरला. याबाबतची माहिती बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळताच, उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला आणि हवालदार आघाव यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.


या कारवाईमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित घटनेबाबत पुढील तपास सुरू असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!