परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 अल्पवयीन मुलीचे अपहरण : अपहरण करणाऱ्याने केला मुलीच्या वडिलांना फोन 




केज :- केज तालुक्यातील एका गावातून १५ वर्षीय वयाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे वडील साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर ड्रायव्हर असून ते शेतात राहतात.दि. १ नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास त्या अल्पवयीन मुलीचे गावातील एका तरुणाने अपहरण केले. रात्री मुलगी घरी न आल्यामुळे आईने नातेवाईकडे शोध घेतला असता; ती आढळून आली नाही. 

दरम्यान दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:०० मुलीचे वडील केज येथे तिचा शोध घेत असताना त्यांना गावातील एका तरुणाने फोन वरून सांगितले की, तुमची मुलगी माझ्या सोबत आहे. त्या तरुणाला मुलीच्या वडिलांनी मुलीला घरी आणून सोड. असे सांगून देखील त्याने मुलीला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले नाही. 

दि. २ नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून अपहरणकर्त्या तरुणा विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ६०४/२०२५ भा. न्या. सं. १३७(२) नुसार गुन्हा करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!