परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
महायुतीच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी बहुमताने निवडून येणार- फुलचंद कराड
फुलचंदराव कराड महायुतीत आल्याने महायुतीला बळ मिळाले- माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी
परळी वैजनाथ दि. २९ (प्रतिनिधी)
महायुतीच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी बहुमताने निवडून येणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक फुलचंदराव कराड यांनी केले. तर फुलचंदराव कराड महायुतीत आल्याने महायुतीला बळ मिळाल्याचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी म्हणाले. ते शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक फुलचंदराव कराड यांच्या संपर्क कार्यालयात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलत होते.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते फुलचंदराव कराड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर त्यांना पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबद्दल कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालयात फुलचंदराव कराड यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना बाजीराव धर्माधिकारी म्हणाले की, महायुतीने माझी सुविद्य पत्नी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे व पर्यावरण बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत होतो पण आता शेवटच्या टप्प्यात परळी मतदारसंघाचे अनुभवी नेते व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे सहकारी राहिलेले फुलचंदराव कराड महायुतीत आल्याने महायुतीला बळ मिळाले आहे. यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुकर झाला आहे. तर फुलचंदराव कराड म्हणाले की, बाजीराव धर्माधिकारी नगराध्यक्ष असताना चांगले काम केले आहे. आता त्यांच्या पत्नी आहेत यांच्या पेक्षा चांगला नगराध्यक्ष परळीला मिळू शकत नाही. यामुळे महायुतीच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी बहुमताने निवडून येण्याची प्रयत्न करणार आहे. त्या निवडून तर येणारच पण त्यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यावेळी फुलचंदराव कराड यांचा व बाजीराव धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा