परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
बस स्थानकावर गर्दीचा गैरफायदा घेऊन दागीने चोरी करणाऱ्या आरोपींचा संभाजीनगर, परळी पोलीसांकडून पर्दाफाश, मुद्देमालासह आरोपी ताब्यात।..
फिर्यादी नामे प्रतिक विलास वाघमारे रा. अंकुश नगर तालुका जिल्हा बीड यांनी पोलीस स्टेशन संभाजीनगर येथे फिर्याद दिली की, त्याची आई सुनिता विलास वाघमारे दिनांक-04/11/2025 रोजी नांदेडहून बीड येथे जात असताना परळी बस स्टॅन्ड येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अनोळखी आरोपीने तिचे गळ्यातील 13 ग्रॅम वजनाचे 1,45,000/ रुपयाचे मिनी गंठण चोरून नेले आहे, वगैरे फिर्यादीवरून पो.स्टे. संभाजीनगर गुरनं 230/2025 कलम 303 (2) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरीष्ठांनी तपास अधिकारी यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. त्यावरून तपासीक अंमलदार पोह/416 साजीद पठाण यांनी गुन्हयाचे तपासात बस स्थानक परळी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहून आरोपी निष्पन्न केले. आरोपी ऑटो मधून गेल्याचे दिसून आले. सदर मार्गावरील परळी शहरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्यांचा मार्ग शोधला असता शहराच्या बाहेर दोन किलोमीटर गेले व तेथे थांबून असलेल्या चार चाकी स्विफ्ट डिजायर गाडी मधून निघून गेले. गाडीचा नंबर व तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोध घेतला असता सदरचा गुन्हा 1. नरसिंग कोंडीबा बंन वय 38 वर्ष रा. गांधीनगर, उदगीर ता.उदगीर जि. लातूर व त्याच्या दोन महिला साथीदारासह केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यात आरोपी नामे नरसिंग कोंडीबा बंन वय 38 वर्ष रा. गांधीनगर, उदगीर ता. उदगीर जि. लातूर यास अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले ₹ 1,45,000/- किंमतीचे सोन्याचे 13 ग्रॅम वजनाचे मिनीगंठण व आरोपीने गुन्हा करताना वापरलेली स्विफ्ट डिझायर चार चाकी गाडी क्रमांक MH-04-JB-1560 किंमत अंदाजे ₹5,00,000/- असा एकूण सदर गुन्ह्यात 6,45,000/-रुपये चा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कार्यवाही मा.श्री. नवनीत कॉवत, पोलीस अधिक्षक सो बीड, मा.श्रीमती चेतना तिडके मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, अंबाजोगाई, मा.श्री. वेंकटराम, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज, अति पदभार अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली श्री. धनंजय ढोणे पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे संभाजीनगर, पोलीस उपनिरीक्षक, श्री. अनिल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्री. संदीप चव्हान, पोह/416 साजीद पठाण, पोशि/1721 शंकर डोंगळे, पोशि/2098 व्यंकट डोरणाळे, पोशि/710 भगवान चव्हान, सर्व नेमणुक पोलीस ठाणे संभाजी नगर परळी वै. यांचे पथकाने केलेली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा