परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
ओंकार (वैद्यनाथ) साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या ना. पंकजा मुंडेंच्या हस्ते शुभारंभ
परळी वैजनाथ।दिनांक ०९।
ओंकार (वैद्यनाथ कारखाना) साखर कारखान्याच्या बाॅयलर प्रदीपन आणि गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या १० नोव्हेंबर रोजी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते होत आहे.
ना. पंकजा मुंडे उद्या परळीत येत असून दुपारी २ वा. त्यांचे गोपीनाथ गड येथे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट क्रमांक ८ या कारखान्याचा बाॅयलर प्रदीपन व गळीत हंगामाचा शुभारंभ दुपारी २.१५ वा. त्यांच्या हस्ते व ओंकारचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, सर्व संचालक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा