परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
गोल्ड लोन साठी सोने तपासून देणाऱ्या सोनारानेच केली बँकांची फसवणूक
फसवणूक करून अनेक महिन्यांपासून फरार असलेला सोनार पुण्यातून पकडला
बीड: सोन्यावर कर्ज ही स्कीम सर्व बँका आणि सर्व प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांमध्ये चालू आहे. परंतु हा सोने तपासून देणाराच जर लफंगा असला तर बँक बुडालीच म्हणून समजा. बीड येथील अशाच एका सोनाराने स्वतः ग्राहक कर्ज घेण्यासाठी तयार केले. कर्जासाठी त्यांची निवेदन बँकेस पाठवली आणि त्यांना बनावट सोने तयार करून दिलं. अशा प्रकारे तयार केलेले सोने बँकेला तपासून देताना ते खरे आहे असे भासवले. बँकेने आंधळेपणाने विश्वास ठेवला आणि लोकांना भरमसाठ कर्ज वाटप केले. असे बनावट १६ ग्राहक बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये या सोनाराने पाठवले आहेत. संशयिताचे नाव विलास उदावंत, राहणार पंडित नगर, नगर रोड, बीड, जो ‘विलास ज्वेलर्स’ नावाने बीड येथे दुकान चालवायचा. जलद श्रीमंत व्हायचे म्हणून त्याने हा उद्योग चालू केला आणि सामान्य लोकांकडूनही “सोने गहाण ठेवा, पुढच्या महिन्यात तुम्हाला जास्त सोनं देतो, पैसे जमा करा, त्या बदल्यात जास्त सोनं देतो” असे खोटे आश्वासन देऊन दोन महिन्यात सर्व मिळून अडीच कोटी रुपयांचे घबाड जमा केले आणि येथील प्रॉपर्टी विकून पसार झाला. बीड येथील सर्व संपर्क त्याने तोडून टाकला. यामध्ये बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने बीड येथील संपर्क तोडल्यामुळे त्याला शोधणे अवघड होते. परंतु गुप्त बातमीदाराने माहिती दिल्यानंतर त्याचा पुण्याचा पत्ता मिळाला. त्याने तेथेही सोने–चांदी विक्रीचे दुकान ‘व्यंकटेश ज्वेलर्स’ नावाने देहूगाव येथे चालू केले होते. त्याला तेथेच दुकानामध्ये बीड शहर पोलीस ठाण्याने नेमून दिलेल्या स्टाफकडून पकडण्यात आले आणि त्याच्या ताब्यातून १८ किलो जप्त करण्यात आली आहेत. ज्या लोकांची फसवणूक केली होती त्या लोकांना यामुळे आता दिलासा मिळाला आहे. सदरील कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार, पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी बाबा राठोड, पोलिस अंमलदार राम पवार, सुशेन उगले, शौकत शेख यांनी पार पाडली आहे. यामधून लोकांना सूचित करण्यात येत आहे की खाजगी लोकांना कुठल्याही आमिषाला बळी न पडता स्वतःचे सोने गहाण ठेवू नये. सोनार आहे, दुकान आहे म्हणून विश्वास ठेवू नये. तसेच बँकांनाही सूचना देण्यात येत आहे की त्यांनी सोन्याचे परीक्षण करणारा नेमताना किंवा सोने तपासणीस नेमताना पूर्ण खात्री करून नेमावा आणि त्याच्या वर्तनावर सतत लक्ष ठेवावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा