परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
आशांना किमान वेतनाचा लाभ सरकारनी द्यावा. कॉ डॉ डी एल कराड
दोन दिवसीय अधिवेशनात विविध ठराव मंजुर
परळी वै ता 9 प्रतिनिधी
आरोग्य विभागातील महत्वाचा घटक असलेल्या आशा व गटप्रवर्क यांना सरकारने कायम सेवेत सामावून घ्यावे व सामाजिक सुरक्षा प्रदान करावी यासाठी CITU कायम आशा व गटप्रवर्क फेडरेशन च्या सोबत राहुन आंदोलनात सहभागी होत असल्याचे मत CITU चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ डॉ डी एल कराड यांनी केले आहे.
परळी येथे 8 व 9 नोव्हेंबर रोजी आशा व गटप्रवर्क फेडरेशन चे 4 थे राज्य अधिवेशन उत्साहात पार पडले. यावेळी अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात कॉ डॉ डी एल कराड बोलत होते. पुढे बोलताना कॉ कराड म्हणाले की देशातल्या 35 टक्के लोकांना घर बांधण्यासाठी स्वतः ची जागा नाही. देशातील 4.5 कोटी लोक अल्पशा उत्पन्नावर काम करतात त्यांना पेन्शन नाही.
योजना कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतले पाहिजे. आशांना सामाजिक सुरक्षा असली पाहिजे. सरकारनी आशांना किमान वेतनाचा लाभ दिला पाहिजे. आशा व गटप्रवर्क संघटना मजबूत करावी लागेल. त्याशिवाय सरकार आपल्या मागण्या मान्य करणार नाही. त्यामुळे यापुढे आशां नी एकत्र येऊन संघटना बळकट करण्याचे आवाहन कराड यांनी केले. यावेळी आशा वर्कर्स यूनियनच्या राज्याध्यक्ष कॉ आनंदी आवघडे, सरचिटणीस कॉ पुष्पा पाटील, सिटु चे राज्याध्यक्ष कॉ एच एम शेख, जिल्हाध्यक्ष कॉ शिवाजी कुरे, सचिव कॉ किरण सावजी, कॉ अशोक थोरात, कॉ प्रभाकर नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन दिवस चाललेल्या अधिवेशनात संघटनात्मक बांधनी व सरकारकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत विविध ठराव पारित करण्यात आले. आभार प्रदर्शन कॉ सुवर्णा रेवले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा लांडगे, हेमा काळे, अनिता गिराम, छाया रणदिवे, सारिका मुंडे, अनिता चाटे, भाग्यश्री थावरे, उमा वाघमारे, भारती राख, सुवर्णमाला मुंडे, जालिंदर गिरी, शेख जावेद, प्रकाश वाघमारे, बाबासाहेब रोडे, शुभम काकडे आदींनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा