परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
पहिलीशी भांडण झाले म्हणून दुसरी केली; अन् तिने जाब विचारताच वस्तऱ्याने वार
![]() |
केज :- किरकोळ कारणा वरून नवरा बायकोत भांडण झाल्याने चार महिन्या पासून पहिली बायको माहेरी राहत असल्याची संधी साधून चक्क एकाने अवघ्या चार महिन्यात दुसरी बायको केली. पहिलीने त्याला दुसऱ्या लग्नाचा जाब विचारताच नवऱ्याने तिला मारहाण करू धारदार वस्तऱ्याने कपाळावर वार करून इतर तिघांच्या मदतीने तिला बेदम मारहाण केल्याची घटना केज शहरात घडली आहे.
केजच्या क्रांतीनगर भागात राहात असलेले सतीश लांडगे आणि त्यांची पत्नी अंजना लांडगे यांच्या मागील चार महिन्या पूर्वी किरकोळ कारणाने भांडण झाल्याने अंजना लांडगे ही तिच्या विवाहित मुलगा आणि सून यांच्या सोबत क्रांतीनगर येथे मुलाच्या घरी राहत होती. दरम्यान याच काळात तिच्या नवऱ्याने दुसऱ्या एका महिले सोबत लग्न करून तो तिच्या सोबत एकत्र राहत असल्याची माहिती अंजना हिस मिळाली. म्हणून अंजना हिने नवऱ्याला त्याचा जाब विचारला आणि त्याने असे का केले ? माझे सर्व सामान आणि घर बांधायला दिलेले दोन लाख रु परत द्या. असे म्हणताच सतीश लांडगे यांनी तिला हाकलून दिले. त्या नंतर दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वा. च्या सुमारास अंजना ही तिचा मुलगा आणि सून ही ऊस तोडणीसाठी साखर कारखान्यावर गेल्याने ती एकटीच घरी असताना तिचा नवरा सतीश लांडगे याच्या सोबत अलका रोहीदास मुजमुले, किरण रोहीदास मुजमुले, कुणाल रोहीदास मुजमुले हे चौघे तिच्या घरी गेले. त्यांनी तिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तर नवरा सतीश लांडगे याने अंजना लांडगे हिच्या कपाळावर धारदार वस्तऱ्याने वार करून जखमी केले.
या प्रकरणी अंजना लांडगे हिच्या तक्रारी वरून तिचा नवरा सतीश लांडगे यांच्यासह अलका मुजमुले, किरण मुजमुले, कुणाल मुजमुले या चौघा विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ५१५/२०२५ भा. न्या. सं. ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार त्रिंबक सोपने हे तपास करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा