परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

NCP (SP) सोबत आघाडीत सामील नाही..... काँग्रेस नंतर उबाठा शिवसेनेचीही वेगळी चूल

परळीत शिवसेना (उबाठा) स्वतंत्र लढणार- उपनेत्या सुषमा अंधारेंची घोषणा




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

परळी वैजनाथ नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख तीनही घटक पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने स्वतंत्र निवडणूक लढवताना दिसत आहेत. काँग्रेसने अगोदरच स्वबळावर निवडणूक लढवण्याचे घोषित केलेले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सोबत उबाठा शिवसेनसोबत आघाडी असल्याचे म्हटले होते. मात्र जागा वाटपात त्यांची आघाडी फिस्कटली असुन आता परळीतील नगराध्यक्षपद व काही निवडक जागा उबाठा शिवसेना स्वतंत्रपणाने लढणार असल्याची घोषणा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

      याबाबत शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले की, परळी येथेसक्षमपणे महाविकास आघाडी म्हणून लढावे अशी आमची भूमिका होती. यासाठी अतिशय नम्रपणाने आम्ही काही निवडक जागांची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडीत राहून काही निवडक जागा लढविण्यावर आम्ही सहमती दर्शविली. मात्र तरीही समाधानकारक जागा सोडण्यासाठी त्यांना अडचण आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार  पक्षाने शिवसेनेला काही निवडक जागाही देण्यात असहमती दर्शवली. त्यामुळे पक्ष म्हणून स्वतंत्र अस्तित्व राखणे आमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे परळीतील नगराध्यक्ष पदासह सहा जागा शिवसेना (उबाठा) स्वतंत्रपणे लढण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. दरम्यान परळी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने गायत्री निलेश पालीवाल यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून नामांकन भरलेले आहे. तर अन्य नगरसेवक पदाच्या सहा जागांवर शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!