परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
सौ.संध्या दिपक देशमुख नगराध्यक्षपदासाठी तर दिपक देशमुखांची नगरसेवक पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर
परळी (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची परळी काल पत्रकार परिषद खा. बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी, पक्षाचे निरिक्षक नरेंद्र काळे, प्रदेश सरचिटणीस राजेभाऊ फड , नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या दीपक देशमुख,माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, जीवनराव देशमुख, उत्तम माने,तालुका अध्यक्ष बाबा शिंदे, अँड.माधव जाधव शहराध्यक्ष सय्यद फिरोज आदींची उपस्थिती होती.
यावेळी प्रभाग क्रमांक सहा खुल्या प्रवर्गामधून दीपक रंगनाथ देशमुख, प्रभाग क्रमांक सात खुल्या प्रवर्गामधून वैजनाथ नागनाथ धंपलवार प्रभाग क्रमांक तीन मधून हासिना जब्बार सय्यद तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्याताई देशमुख यांची नावे यावेळी जाहीर करण्यात आली. परळीतून लोकसभेला मोठ्या मताधिक्याने मतदान झाले असून विधानसभेत अपघात वगळता दहशत वगैरे असल्यामुळे चांगले यश मिळू शकले नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढू, महाविकास आघाडीत कुणी वेगळे लढत असेल तर त्याची मनधरणी करून एकत्रित लढण्याचा प्रयत्न करणारा असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परळी तालुका व बीड जिल्हा शरद पवारांना मानणारा आहे.जनतेने साथ द्यावी आणि २ डिसेंबरला मतदान करून निवडून द्यावे, असे आवाहन यावेळी पत्रकार परिषदेत खासदार बजरंग सोनवणे केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा