परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

15 जानेवारीला होणार मतदान...

 राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुका जाहीर 




उमेदवारी अर्ज भरणे ------२३ डिसेंबर

अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस ------३० डिसेंबर

उमेदवारी अर्जाची छाननी -----३१ डिसेंबर

अर्ज मागे घेण्याचे मुदत -----२ जानेवारी

चिन्ह वाटप ------३ जानेवारी

मतदान --१५ जानेवारी

मतमोजणी -----१६ जानेवारी

           महाराष्ट्र राज्यातील 29 महापालिका निवडणुकी संदर्भात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. एकूण 29 महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे.त्यामधील 27 महानगरपालिकांचे मुदत संपलेली आहे. पाच महापालिकांचे 2020 मध्येच मुदत संपली होती. जालना आणि इचलकरंजी या दोन नवनिर्मित महापालिका आहेत. मुंबई महापालिकेत प्रभागामध्ये एक सदस्य प्रभाग आहेत आणि यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक मतदाराला फक्त एक मत द्यावे लागेल. 28 महापालिका या बहुसदस्यीय आहेत.  बहुतांश महापालिकेमध्ये एका प्रभागांमध्ये चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्या महापालिकेमधील काही प्रभाग असे आहेत की जिथे तीन उमेदवार असतील. काही प्रभाग असेल  असतील की जिथे पाच उमेदवार असतील. त्यामुळे या 28 महानगरपालिकेमध्ये मतदारांना साधारणतः तीन ते पाच मतं एका प्रभागांमध्ये द्यावे लागतील. या महापालिका निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाइनच घेण्यात येईल. यासंदर्भात राजकीय पक्षांची जी बैठक झाली होती आणि राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाइनच स्वीकारण्यात येतील. ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र  सादर करणे आवश्यक आहे. मात्र जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा त्यांनी दिला तरी तो एक्सेप्ट केला जाईल. मात्र सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र उमेदवारांना द्यावे लागेल. सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवारांची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल.

     या निवडणुकीमध्ये एकूण मतदार हे तीन कोटी 48 लाख 78 हजार सतरा असणार आहेत. त्यापैकी पुरुष मतदार 1 कोटी 81 लाख 93 हजार 666 अआहेत. महिला मतदार एक कोटी 66 लाख 19 हजार 755 आहेत. इतर मतदार ४५९० असतील. या निवडणुकीमध्ये 39 हजार 147 इतके मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे. ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून घेतली जाईल. त्यासाठी कंट्रोल युनिट 43958 असतील बॅलेट युनिट 87 हजार 916 असतील. बृहन्मुंबई महानगर पालिकेसाठी मतदान केंद्र एकूण 10011 मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी कंट्रोल युनिट 11,349 असेल बॅलेट युनिट 22698 असतील.या निवडणुकीसाठी जी मतदार यादी वापरली जाणार आहे त्यासाठी एक जुलै 2025 ही अधिसूचित केलेल्या दिनांकाला असलेली मतदार यादी यासाठी वापरली जात आहे. एक जुलै 2025 ची मतदार यादी ही प्रभागनिहाय आहे. प्रभागनिहाय  विभाजित करण्यात आलेली आहे.  ही मतदार यादी ही भारत निवडणूक आयोगाकडून  घेतलेली मतदार यादी असल्यामुळे त्यामध्ये कुठलेही नाव डिलीट करणे किंवा कुठले नाव त्यामध्ये ऍड करणे याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीयेत. मात्र चुकीने एखाद्या प्रभागामधील मतदाराचे नाव  दुसर्‍या  प्रभागांमध्ये जर गेले असतील ते बदल करण्याचे अधिकार आहेत. टंकलेखना मधल्या किंवा लेखनिकांच्या काही चुका असतील तर त्या सुद्धा दुरुस्त करण्याचे अधिकार आहेत.  

        विधानसभेच्या मतदार यादी मध्ये नाव आहे मात्र प्रप्रभागनिहा मतदार यादी मध्ये नाव नाहीये ते सुद्धा नाव दुरुस्त करण्याचे अधिकार असतील. निवडणुकीसाठी मतदार यादी मधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे. आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार असं त्यावर मार्क करण्यात आलेला आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे ती केलेली आहे. संभाव्य दुबार मतदारांमध्ये महापालिका आयुक्तांचे मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे. त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करेल यासंदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आले आहे. ज्यांनी अद्याप लिहून दिलेले नाही त्यांना ते जर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले आणि त्यांचा संभाव्य दुबार मतदार म्हणून नोंद आहे तर त्यांच्याकडून हमी पत्र स्वीकारले जाईल.  त्याची ओळख पटवली जाईल आणि ओळख पटवल्यानंतरच त्याला मतदान करता येईल. 

          याशिवाय या निवडणुकीसाठी एक लाख 96 हजार 605 इतके कर्मचारी निश्चित करण्यात आलेला आहेत.प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध प्रसारित करता येणार नाही. या निवडणुकीसाठी मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर प्रचारावर निर्बंध राहणार आहे. एकूण महानगरपालिका 29 आहेत. एकूण जागा म्हणजे एकूण जागा त्यासाठी निवडणूक होणार आहे. ती 2869 जागेसाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये महिला 1442 अनुसूचित जाती 341 अनुसूचित जमाती 77 आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग 759 महानगरपालिका 29 एकूण जागा 2869 मातीला 1442 अनुसूचित जाती 341 अनुसूचित जमाती 77 नागरिकांचा मागास प्रवर्ग 759 या निवडणुकीमध्ये जर निवडणुकीच्या खर्चावर जी मर्यादा आहे दोन मुंबई सहज अ वर्ग महानगरपालिकेसाठी 15 लाख महानगरपालिकेसाठी तेरा लाख क वर्ग महानगरपालिकेसाठी अकरा लाख आणि ड वर्ग महानगरपालिकेसाठी नऊ लाख आज पासून संबंधित सर्व 29 महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जरी आचारसेता या 29 महानगरपालिका शेत्र पृथ्वी जरी असेल तरी या महानगरपालिका क्षेत्राबाहेर जर एखादी घटना किंवा एखाद्या कार्यक्रम किंवा एखादी घोषणा अशा प्रकारे करण्यात आली की जी महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव करणारी आहे तर त्यावर सुद्धा आचारसहिता लागू होणार आहे मात्र ही आचारसंहिता नैसर्गिक आपत्तीच्या उपायोजना आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझास्टर असतात त्यासाठी मदतीसाठी ही आचारसहिता यामध्ये आडकाठी असणार नाही.

        नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025, नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025 ,उमेदवारी माघारची मुदत उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी 2026 ,निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026  मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026, मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!