परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

उम्मीद पोर्टलवरील वक्फ नोंदणीची अंतिम तारीख वाढवावी: मौलाना इलियास खान फलाही

परळी, प्रतिनिधी : 2009 ते 2025 या सोळा वर्षांच्या कालावधीत वक्फ नोंदी डिजिटल करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. आतापर्यंत वेबसाइटवर अपलोड केलेला डेटा अपूर्ण, चुकाांनी भरलेला असून त्यात जिओ-टॅगिंगचाही अभाव आहे. म्हणजेच, सर्व प्रशासकीय यंत्रणा असूनही सरकार स्वतः रेकॉर्ड अपलोड करू शकलेले नाही, आणि उलट जनतेला काही महिन्यांत हे काम पूर्ण करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारने वक्फ नोंदणीची अंतिम तारीख वाढवावी, अशी मागणी जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात केली.


आपल्या निवेदनात मौलानांनी म्हटले आहे की भारत सरकारच्या 'उम्मीद पोर्टल'वर वक्फ नोंदणीची अंतिम तारीख 6 डिसेंबर दर्शवली जात आहे, आणि अजूनही मोठ्या प्रमाणात नोंदणीचे काम शिल्लक आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रचे अध्यक्ष यांच्या मते, पोर्टलची गती अत्यंत मंद असल्याने नोंदणी पूर्ण होत नाही आहे. अनेक दिवसांपासून पोर्टल खूपच धीमे चालत असल्यामुळे वक्फ मालमत्तांच्या नोंदणीमध्ये अडचणी येत आहेत आणि त्यामुळे नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही.


मौलाना इलियास खान फलाही यांनी सांगितले की महाराष्ट्रातील 80 टक्के वक्फ मालमत्तांची नोंदणी झाली आहे, तर 20 टक्के मालमत्ता अद्यापही नोंदणीसाठी शिल्लक आहेत. मात्र, सत्यापन केवळ 20 टक्के प्रकरणांचेच झाले असून उर्वरित 80 टक्के मालमत्तांचे सत्यापन अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे 100 टक्के वक्फ मालमत्तांची नोंदणी अपेक्षित असेल तर केंद्र सरकारने नोंदणीची अंतिम तारीख वाढवावी, अशी आमची विनंती आहे. अंतिम तारीख वाढवण्याबरोबरच पोर्टलमधील तांत्रिक त्रुटीदेखील त्वरित दुरुस्त कराव्यात, जेणेकरून हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!