परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

नवमतदारासाठी अविस्मरणीय क्षण....

विलक्षण योगायोग : जीवनातील मतदानाचा पहिल्यांदाच बजावला हक्क- तोही स्वतःच्या आईलाच मतदान करण्याची मिळाली संधी

परळी वैजनाथ , प्रतिनिधी....

    निवडणुकीसाठी अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष मतदान करण्याची संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. पहिल्या मतदानाचा हक्क बजावताना ची प्रत्येकाची भावना ही विलक्षणच असते. मात्र जीवनातील मतदान करण्याची पहिलीच वेळ आणि त्याच वेळेला आपले पहिले मतदान आपल्या जन्मदात्या आईलाच करण्याचे भाग्य लाभण्याची संधी परळीतील नवमतदार चि.आद्य बाजीराव धर्माधिकारी याला मिळाली आहे. हा एक विलक्षण योगायोग घडून आला आहे.

             परळी वैजनाथ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी निवडणूक लढवली आहे. जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवड असल्याने तमाम परळीकरांमधून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार निवडला जाणार आहे. याचवेळी सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचा मुलगा चि. आद्य बाजीराव धर्माधिकारी याला जीवनातील पहिलेच मतदान करण्याची संधी प्राप्त झाली आहे या निवडणुकीत नवमतदार असलेल्या चि. आद्यला जीवनातील पहिले मतदान करण्याची संधी तर मिळालीच परंतु  विलक्षण योगायोग असा की, या नव मतदार युवकाला आपले पहिले मतदान करायचे आणि तेही स्वतःच्या जन्मदात्या आईलाच मतदान करण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झाली. परळीच्या निवडणुकीत हा एक आत्मीय व अविस्मरणीय क्षण बघायला मिळाला आहे.

दरम्यान, आपल्या जीवनातील पहिलेच मतदान हे माझ्या आईसाठी मला देता येत आहे. ही माझ्यासाठी जीवनातील सर्वात मोठी अविस्मरणीय आणि हृदयात घट्ट बसणारी घटना असणार आहे. नव मतदार म्हणून मी तर माझ्या आईला माझे पहिले मतदान दिलेच आहे. त्याच पद्धतीने सर्व नवमतदार ,युवकांचाही भरभरून आशीर्वाद नगराध्यक्ष पदासाठी माझ्या आईच्या व सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी निश्चितच असणार आहे अशी भावना चि.आद्य याने यावेळी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!