जलद तपास: परळीजवळ डोळ्यात मिरचीची पुड टाकुन जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद
परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...
परळीजवळ तरुणाच्या डोळ्यात चटणी टाकून चार जणांनी सोन्याची चैन, अंगठ्या असा २ लाख २० हजार रुपयाचा ऐवज पळविल्याची घटना दि.5 रोजी घडली होती.याचा जलद तपास करीत स्थानिक गुन्हे शाखा बीड च्या पथकाने जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे.
धारावती तांडा रोडवर जिम करून येणाऱ्या तरुणाच्या गाडीला धडक देऊन चाकूचा धाक दाखवून डोळ्यात चटणी टाकून २ लाख २० हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ४ जणां विरुद्ध परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल कारण्यात आला होता. धारावती तांडा येथील यशवंत प्रेमदास पवार हे 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता हे व्यायाम करून परळीवरून धारावती तांड्याकडे मोटारसायकलवरून जात असताना, काळरात्री देवी मंदिर रोडवर एका बंद धाब्यासमोर दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार आरोपींनी त्यांचा पाठलाग करत अचानक धडक दिली. तोंडाला मास्क लावून त्यापैकी एकाने चाकू दाखवून धमकावले, तर दुसऱ्याने त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना धरून ठेवले. त्याच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची सोन्याची चैन आणि एक तोळ्याच्या दोन अंगठ्या हिसकावून चोरटे फरार झाले. साडेतीन तोळ्यांची सोन्याची चैन – ₹1,40,000 दोन सोन्याच्या अंगठ्या – ₹80,000 असे एकूण ₹2,20,000 रुपयेचे किमतीचे साहित्य लुटून घेऊन पसार झाले होते.
त्यावर पोलीस अधीक्षक बीड यांनी बीड जिल्हयात रोडवर होणारे जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे व त्यांचे पथक यांना दिनांक 08/12/2025 रोजी परळी येथे वरील गुन्ह्यात तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी नामे 1) पंकज तुकाराम उगलमुगले वय 25 वर्षे रा. पाडळी ता. शिरूर कासार ह.मु. पांगरी ता. परळी, जि.बीड 2) वैभव राम बिडगर, वय 20 वर्षे रा. दाऊतपूर ता. परळी जि.बीड 3) श्यामसुंदर बालासाहेब फड वय 20 वर्षे रा.मरळवाडी ता. परळी जि.बीड 4) आदित्य सुरेश उपाडे वय 20 वर्षे, रा. सिध्दार्थ नगर, परळी जि.बीड यांनी गुन्हा केला आहे. त्यावर पोउपनि सुशांत सुतळे व पथक यांनी तात्काळ या इसमांना शिताफिने पकडून त्यांचेकडे विचारपूस करून तपास केला. सदरील इसमांनी परळी येथील बॉस फिटनेसच्या बाहेरून फिर्यादीचा पाठलाग करून त्याची मोटार सायकल जबरीने थांबवून त्याचे डोळ्यात मिरचीची चटणी टाकुण शस्त्राचा धाक दाखवून त्याची चैन व अंगठी जबरीने चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरील गुन्ह्यात चोरी गेलेली चैन, अंगठी, मोटार सायकल, स्कुटी व एक कोयता असा एकूण 1,58,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
ही कामगिरी श्री. शिवाजी बंटेवाड (पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड) पोलीस उप निरीक्षक श्री. सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णू सानप, गोविंद भताने, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, चालक पो.ह. अतुल हराळे यांनी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा