परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
ॲड.सतीश देशमुख यांना पितृशोक, बालासाहेब देशमुख यांचे निधन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...
शहरातील गणेशपार भागातील देशमुख गल्ली येथील रहिवासी तथा नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी कै. बालासाहेब गंगाधरराव देशमुख यांचे दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 8:15 वाजता वार्धक्याने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 81 वर्ष होते.
गाव भागातील देशमुख गल्ली येथील रहिवाशी तथा सर्व सुपरिचित व्यक्तिमत्व असणारे नगरपालिकेचे माजी कर्मचारी कै. बालासाहेब गंगाधरराव देशमुख यांचे वयाच्या 81 व्या वर्षी वार्धक्याने दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 81 वर्ष होते. कै. बालासाहेब देशमुख हे जुन्या पिढीतील अत्यंत मनमिळावू, सुस्वभावी तथा धार्मिक वृत्तीचे सर्वांसोबत स्नेहबंध जपणारे व्यक्तिमत्त्व होते. नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी असणारे बालासाहेब देशमुख अतिशय शिस्तप्रिय तथा प्रामाणिक वृत्तीचे मानले जात. त्यांच्या पश्चात 1 बहीण, 3 मुले, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. येथील प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. सतीश देशमुख यांचे ते वडील होत. बालासाहेब देशमुख यांच्या पार्थिवावर दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 : 30 वाजता वैद्यनाथ मंदिर च्या पाठीमागे सार्वजनिक स्मशानभूमी या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात येतील. अंत्ययात्रा देशमुख गल्ली राहते घर येथुन सकाळी 11 : 30 वाजता निघेल. देशमुख परिवारावरती कोसळलेल्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा