परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

ना.पंकजाताई, डॉ.प्रितमताई, आ.धनंजय मुंडेंसह राज्यभरातील हजारो कार्यकर्ते समाधीसमोर नतमस्तक

 गोपीनाथगडाची निर्मिती वंचित, उपेक्षितांसाठीच; त्यांच्याच आदर्शावर माझी वाटचाल - ना.पंकजा मुंडे

लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथगडावर उसळली अलोट गर्दी

रक्तदान शिबीर, गरजुंना मदत, अन्नदानासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन


परळी वैजनाथ।दिनांक १२। गोपीनाथगडाची उभारणी हीच मुळात लोकनेते मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला नतमस्तक होता यावे, त्यांचे सुख-दु:ख त्याला मस्तक टेकून सांगता यावे यासाठी केलेली आहे. पृथ्वीतलावरील एकमेव असा हा गड आहे जो एका लेकीने आपल्या वडीलांच्या स्मृतीनिमित्त उभा केला आहे. वास्तविक पाहता हा गड मी उभा केलेला नाही तर ईश्वरानेच हे घडवून आणलेले आहे. मुंडे साहेबांनी  आयुष्यातला क्षण न् क्षण वंचित, पिडीतांसाठी वेचला आहे, त्यांच्याच आदर्शावर माझी वाटचाल आहे अशा शब्दात राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंञी ना.पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

          लोकनेते मुंडे साहेब यांची जयंती आज गोपीनाथ गडावर विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली, त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी  संवाद साधताना त्या बोलत होत्या. प्रारंभी  सकाळी ना.पंकजाताई मुंडे, मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, आ.धनंजय मुंडे व मुंडे परिवाराने लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी पुढे बोलताना ना.पंकजाताई म्हणाल्या,  मुंडे साहेबांच्या जीवनाचा प्रवास वंचित, पिडीतांसाठी होता. प्रत्येकवेळी स्वत:पेक्षाही जास्त  विचार त्यांनी लोकांचा केलेला आहे. स्वत:च्या जिवापलीकडे जावुन इतरांचा विचार करणारा हा अव्दितीय लोकनेता व माझा पिता आहे.  मुंडे साहेबांचा एकदा अपघात झाला होता तो फार भयंकर होता त्यावेळी एक लहान मुलगा रस्ता पार करत असताना त्याला वाचविण्यासाठी चालकाने गाडी अचानक वळवली, तो मुलगा बचावला पण मुंडे साहेबांनाच खुप मोठी हानी झाली, रुग्णालयात दाखल केले गेले.  मुंडे साहेब शुध्दीवर आल्यानंतर पहिला प्रश्न त्यांनी विचारला  तो मुलगा कसा आहे? त्याला काही लागलयं का? त्याचा पुर्ण इलाज करा, त्याला तर खरचटलं पण नव्हतं. परंतु अशा स्वत:च्या जिवावर बेतलेल्या वेळीही  मुंडे साहेबांना काळजी लोकांची होती. स्वत:च्याही पलिकडे जावुन त्यांनी लोकांचा विचार नेहमीच केला. मी मुंडे साहेबांच्या समाधीच्या चरणी हीच प्रार्थना केली की त्यांनी जे-जे उभा केले  ते मोठे करण्याची आमची क्षमता असो अथवा नसो पण त्याला सदृढ ठेवणं आणि ती परंपरा कायम ठेवणं हेच आशीर्वाद आम्हाला द्या.

कामाचं आणि अधिकाराचं विकेंद्रीकरण

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश आहे की, प्रत्येक जनसेवेच्या कामाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे याच पध्दतीने अधिकारांचेही विकेंद्रीकरण केलं पाहिजे. हीच बाब लक्षात घेवुन मी देखील काम आणि अधिकार यांचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. या विकेंद्रीकरणातून जनतेच्या न्यायाची भूमिका निश्चित पार पडणार आहे. गोपीनाथगडावर दशकभरात आपण भव्य-दिव्य कार्यक्रम केले माञ गेल्या वर्षापासून मी प्रत्येकाने मुंडे साहेबांना अभिप्रेत अशा सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी करावी  अशा पध्दतीचा संदेश देत एक प्रकारे  विकेंद्रीकरणाची पध्दत सुरू केली. त्याला राज्यभरातून प्रतिसादही मिळाला आहे. यावर्षीही त्याच पध्दतीने लोकांनी ऊसाच्या फडात असो, दवाखान्यातून असो, अनाथ आश्रमातून असो किंवा गरजवंतांना मदत करणे असो अशा विविध सामाजिक सेवा उपक्रम राबवुन जयंती साजरी केली. मुंडे साहेबांना अभिप्रेत अशी सामाजिक न्यायाची भूमिक यातुन निर्माण होते याचा खरोखरीच आनंद वाटतो असे पंकजाताई म्हणाल्या.


गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने गरजुंना ब्लँकेट

मुंडे साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधुन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यनाथ मंदिर येथे गोरगरीब व गरजुंना कडक हिवाळा लक्षात घेवुन उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने  प्रितेश तोतला, नितीन समशेट्टी, आश्विन मोगरकर, अनिश अग्रवाल, माऊली आघाव हे यावेळी उपस्थित होते.

क्षणचिञे-

लोकनेते मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गोपीनाथगडावर राज्यभरातील कार्यकर्त्यांची मोठी रिघ; "अमर रहे,अमर रहे, मुंडे साहेब अमर रहे" च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

ना.पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या आवाहनानुसार रक्तदान शिबीर, गरजुंना मदत, अन्नदानासह विव‍िध सामाजिक उपक्रमांचे वाडी, वस्ती तांड्यासह ठिकठिकाणी आयोजन

गोपीनाथगडावर जयंतीनिमित्त भजनी मंडळाकडून भजन सेवा सादर यात स्वत: ना.पंकजाताई हातात टाळ घेवुन तल्लीन

रक्तदान शिबीरात शेकडो कार्यकर्त्यांकडून रक्तदान

मा.मंञी बदामराव पंडीत, बाळराजे पवार, माधव निर्मळ, अक्षय मुंदडा, ह.भ.प.राधाताई सानप, प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक मान्यवरांची हजेरी

सातारा येथील डॉ. राजेंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली बारा वर्षे अखंडीतपणे काढण्यात येणारी शिखर शिंगणापूर ते परळी वैजनाथ या संघर्षज्योतीचे यावेळी डॉ.प्रितमताई मुंडे यांनी स्वागत केले

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!