परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमध्ये सातव्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन
शालेय कामकाजातील सर्वात महत्त्वाचा व जल्लोषाचा दिवस म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा,यासाठी आज सातव्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी विविध संकल्पनेवर वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी 'वर्ल्ड ऑफ इमोशन 'या संकल्पनेवर विद्यार्थी आपले कलागुण सादर करणार आहेत.
यावर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नवनीत कांवत सर (पोलीस अधीक्षक, बीड),सन्माननीय अतिथी शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत मा.श्री.किरण गित्ते साहेब (सचिव,त्रिपुरा सरकार),स्वामी विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम, श्री.गणेश गिरी सर (गटशिक्षणाधिकारी) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे या कार्यक्रमास 'मुरंबा' या मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा बोरुले मॅडम यांची खास उपस्थिती लाभणार आहे.
सदरील वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये पोदार जम्बो किड्स, डी.डब्ल्यू.पी.एस वंडरलँड व दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमधील सहाशेहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शालेय व्यवस्थापन समिती व शाळेचे प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर यांनी सर्वच पालकांना केले आहे. तरी सर्वांनी दि. 13 डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा