परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
ज्ञानबोधिनी प्राथमिक विद्यालय, गणेशपार विभाग बालवर्ग,इयत्ता 1ली ते 7वी या वर्गाचा पालक सुसंवाद मेळावा उत्साहात
यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यानंतर शाळेत राबविले जाणारे गणित,इंग्रजी, भूगोल,मराठी या विषयावर आधारीत शैक्षणिक उपक्रम सादर करण्यात आले. यावेळी ज्ञानबोधिनी प्राथमिक शाळेचे सचिव तथा मुख्याध्यापक श्री मुंडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पालक मेळाव्यात अनेक पालकांनी शाळेविषयी व संस्थेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे सर हे राबवित असलेल्या शैक्षणिक उपक्रमाविषयी विशेष कौतूक केले. अल्पावधीतच शाळेने निर्माण केलेल्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल व राबवत असलेल्या संस्कृती व शैक्षणिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
या शाळेची आणखी सर्वांगीण प्रगती करण्यासाठी पालक स्वतः पुढे आले आहेत. शाळेसाठी सर्व मदत करण्याची सर्व पालकांची मानसिकता आहे. शिक्षण माञ उच्च दर्जाचे आहे. असे अनुभव या शाळेविषयी अनेक पालकांनी व्यक्त केले. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन, भारतीय संस्कृतीची जपवणूक करण्यासाठी विविध सणाला अनुसरून घेतले जाणारे सांस्कृतिक उपक्रम ,विविध स्पर्धा, मुलांची आरोग्य तपासणी , शैक्षणिक सहल हे सर्व उपक्रम शाळेने पालकांच्या सहकार्याने घेतले आहेत. मुलांची शैक्षणिक व स्पर्धा परीक्षेतील प्रगती सुद्धा ऊतम असल्याचे पालकांनी व्यक्त केले . आम्ही शाळेतील प्रवेश वाढविण्यासाठी साठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे पालकांनी या वेळी सांगितले. नक्कीच पालकांच्या माध्यामातून शाळेचा दर्जा वाढल्या शिवाय राहणार नाही हे माञ नक्की आहे. असेच पालकांनी सहकार्य करावे. शाळा निश्चितच यापेक्षाही जास्त गुणवत्ता व दर्जा येणाऱ्या काळामध्ये सिद्ध करेल. असा आत्मविश्वास शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे सर यांनी व्यक्त केला आहे.येणाऱ्या शैक्षणिक वर्षात अतिशय काटेकोर शैक्षणिक नियोजन करून शाळेचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.याप्रसंगी श्री.जाधव सर यांनी पालकांना मार्गदर्शन केले सर्व उपस्थित मान्यवरांनी शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
पालक सुसंवाद मेळाव्याचे अध्यक्ष पालक श्री मोगरकर अश्विन यांनी शाळेविषयी आपले मत व्यक्त केले. विध्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना नेहमी या शाळेत वाव दिला जातो शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.त्यासाठी या शाळेत होणाऱ्या सांस्कृतिक,समाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास होतो. तसेच शाळेत राबवले जाणारे उपक्रम व अभ्यासक्रम याविषयी शाळेचे कौतुक केले. यानंतर महिला पालक यांनी शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पालकांसाठी नाष्टा व चहाची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रमाची सांगता राज्यगीताने केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.केंद्रे सर यांनी तर प्रास्ताविक सौ. वाघमोडे मॅडम यांनी केले विविध उपक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गवंडगावे सर व सौ.मुंडे मॅडम यांनी केले तर आभार श्रीमती घोडके मॅडम यांनी मानले शाळेतील श्री क्षीरसागर सर, श्री आलापुरे सर,धुमाळ सर,सौ.खोत मॅडम,सौ.सूर्यवंशी मॅडम सौ.गित्ते मॅडम,सौ.शेप मॅडम,सौ.घोळवे मॅडम सर्व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा