परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
ऊस दरावरून शेतकऱ्यांनी रोकला राष्ट्रीय महामार्ग 5 तास रास्ता रोको; वाहतूक पूर्ण ठप्प
अपेक्षित दर न मिळाल्यास ऊस पुरवठा बंद करणार
परळी / प्रतिनिधी....बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यासह सोनपेठ, गंगाखेड परिसरातील असंख्य शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्याऱ्या गंगाखेड येथील जी 7 साखर कारखाना व लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याने सुरू असलेल्या गळीत हंगामात पहिली उचल 3 हजार व अंतिम भाव 4 हजार रु देण्यात यावा याकरिता सोमवार दि 15 रोजी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको केले. सलग 5 तासापासून हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने परळी-परभणी मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प होऊन असंख्य वाहनांच्या रांगा दुतर्फा लागलेल्या होत्या. मागण्याकरिता जिल्हाधिकारी स्तरावर बैठक आयोजित करण्यात आल्याने हे रास्ता रोको स्थगित करण्यात आले आहे. साखर कारखान्याने अपेक्षित दर न दिल्यास ह्या कारखान्यावर ऊस न देता बहिष्कार टाकण्याचा मानसिकतेत ऊस उत्पादक शेतकरी असून कारखान्याना ऊस पुरवठा करण्या-या गावात याबाबत बैठक देखील शेतकरी घेणार आहेत.
वाढती महागाई, खते व निविष्ठा दरवाढ यामुळे उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली असून कृती समितीने बीड जिल्ह्यात केलेल्या आंदोलनाची गंभीर दखल घेत जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने व परभणी जिल्हयातील बहुसंख्य साखर कारखाना यांनी आश्वासन दर देऊन खात्यावर देयक अदा केले असताना गंगाखेड येथील जी 7 व लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याने ऊसाला किमान प्रति टन 3000 रूपये एक रक्कमी पहिली उचल तर 4000 रूपये अंतिम दर देण्यात यावा या मागणीकरिता हा रस्ता रोको करण्यात आला होता. भर उन्हात हजारो शेतकरी रस्त्यावर ठिय्या मांडून होते. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागार नाहीच या भूमिकेतून आंदोलनाला आलेल्या शेतकऱ्यांनी घरून बांधून भाकरी रस्तावर सोडून जेवण केले. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून परभणीचे जिल्हाधिकारी यांनी गंगाखेड येथील तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन यांना मध्यस्ती करायला सांगत बुधवार दि 17 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करून मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने हे रास्ता रोको स्थगित करण्यात आले असले तरी या साखर कारखान्याना ऊस पुरवठा करणारे शेतकरी गावागावात ऊस दर बाबत मागणी मान्य न झाल्यास या दोन्ही साखर कारखान्यावर बहिष्कार टाकण्याची निर्णायक भूमिका निभावणार आहेत. या रस्ता रोको आंदोलनात ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे प्रसंगी संघर्ष समितीचे कॉ.राजन क्षीरसागर, एड.अजय बुरांडे, दिपक लिपने डॉ सुभाष कदम, श्रीकांत भोसले लक्ष्मण पौळ, कॉ.ओंकार पवार, रामेश्वर मोकाशी, ,कॉ.शिवाजी कदम, श्रीराम बडे , सुरेश इखे गोपीनाथ भोसले, भगवान शिदे, भगवान बडे व्यंकटराव भोसले आदींसह परिसरातील असंख्य गावातील हजारो शेतकरी सहभागी होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा