मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

 गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती आभा मुंडेसह परळीतील जलतरणपटूंचा सत्कार 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी)....

      गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने जलतरण क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय तथा राज्यस्तरीय पातळीवर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या परळीतील जलतरणपटूंचा सत्कार झी लिटेरा स्कूलच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय पातळीवर दिव्यांग जलतरणात सलग दोन वर्ष पाच : पाच सुवर्णपदकांची कमाई तसेच पहिल्या वहिल्या राष्ट्रीय दिव्यांग योगासन स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करून परळीच नव्हे तर बीड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या आभा गणेश मुंडे हिचा यावेळी विशेष गौरव करत पहिल्याच प्रयत्नात जलतरणात राज्यस्तरापर्यंत मजल मारणाऱ्या चिरंजीव वरद लांडगे, कुमारी सिद्धी चाटे, कुमारी राजनंदिनी चाटे, कुमारी आर्या वेरुळे यांच्यासह उदयोनमुख जलतरणपटू कुमारी स्वरा चाटे यांचाही यावेळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार देत फेटा बांधून सत्कार करण्यात आला.


   याबाबत अधिक माहिती अशी की, परळी तालुक्याची भूमिपुत्र असणाऱ्या कु. आभा मुंडे हिने नुकत्याच हैदराबाद येथे पार पडलेल्या राष्ट्रीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पाच सुवर्णपदकांची कमाई करत विशेष भीम पराक्रम केला आहे. तसेच यावर्षीच्या पहिल्या राष्ट्रीय दिव्यांग योगासन स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावून तिने दुहेरी यशाची नोंद केली आहे. दरम्यान राष्ट्रीय स्तरावरील आभाच्या यशाबरोबरच जलतरणात आभाची प्रेरणा घेत पहिल्याच प्रयत्नात जलतरणात राज्यस्तरीय मजल मारणाऱ्या परळीचे जलतरणपटू कुमारी आर्या वेरुळे, चिरंजीव वरद लांडगे, कुमारी सिद्धी चाटे, कुमारी राजनंदिनी चाटे यांनी देखील आपल्या जलतरणातील प्राविण्याने परळी व बीड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. प्रशिक्षक गणेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाचही मुले यशस्वीरीत्या पुढे सरसावली आहेत. या कामगिरी बद्दल या सर्व जलतरणपटूंचा देखील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उद्योनमुख दिव्यांग जलतरणपटू असलेल्या कुमारी स्वरा चाटे हिचाही या कार्यक्रमात यथोचित सन्मान करण्यात आला.


   झी लिटेरा स्कूलच्या प्रशस्त सभागृहात पार पडलेल्या या प्रतिभावंतांच्या गुणगौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे आस्थापना विभाग प्रमुख प्रकाश चाटे यांनी केले. या गौरव सोहळ्यात मान्यवरांनी या खेळाडूंच्या कार्याचा गौरव करताना परळीतील जलतरण क्षेत्राला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता परळी शहर पुढील काही वर्षात जलतरण क्षेत्रामध्ये भक्कम केंद्र बनण्याची आशा व्यक्त केली. याप्रसंगी झी लीटेरा स्कूलचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र वंगे दादा, परळीचे गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, झी लिटेरा स्कूलचे प्राचार्य कैलास घुगे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कोकणे साहेब, बालासाहेब दहिफळे, गोविंद कराड, श्रीमती हिना अन्सारी, प्रकाश चाटे यांच्यासह दिव्यांग समावेशित शिक्षण विभाग पंचायत समिती परळी वैजनाथ चे सर्व कर्मचारी तथा येथील गटशिक्षण अधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी तसेच पालक श्री. गणेश मुंडे, श्री. वैजनाथ वेरूळे, पत्रकार श्रीराम लांडगे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....