परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
ओंकार साखर कारखाना ( वैद्यनाथ ) देणार प्रति मे. टन रु. ३०५०/ दर
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात हे रूपांतर आता ओंकार साखर कारखान्यात झालेले आहे. कारखान्याच्या यावर्षीच्या गळीत हंगामात ऊस उत्पादकांना ३०५० दर जाहीर करण्यात आला आहे. या अनुषंगाने पहिला हप्ता 2950 प्रति मे.टन दराने शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा कारखाना प्रशासनाने आज पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
चेअरमन बाबुरावजी बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट क्र. ८ पांगरी ता. परळी वैजनाथ जि. बीड कारखाना व्यवस्थापनाने गळीत हंगाम २०२५-२०२६ साठी गाळपास येणाऱ्या ऊसाचा दर निश्चित केला आहे. यंदाच्या हंगामासाठी कारखान्याकडून प्रति मे. टन रु. ३०५०/- दर जाहीर करण्यात आलेला आहे. गळीतास येणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता रुपये २९५०/- प्रति मे. टन व दीपावली सणासाठी दुसरा हप्ता रुपये १००/- प्रति मे. टन दर देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतलेला आहे. तसेच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना हंगाम २०२५-२६ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाच्या टनेजनुसार कारखाना धोरणाप्रमाणे दीपावली सणानिमित्त मोफत साखर वाटप करण्यात येईल अशी माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर वैभव व्ही. काशीद यांनी दिली.
कारखान्यास ऊस पुरवठादार, शेतकरी यांचे सहकार्य आणि विश्वास नेहमीच कारखान्यासोबत राहिल. यापुढेही आपला कारखाना आपल्या हितासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास तत्पर राहील अशी ग्वाही ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट क्र. ८ पांगरी ता. परळी यांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा