परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचवायला गेलेल्या पतीसह दोघांचाही बुडून मृत्यू
केज :- विहिरीत पाणी काढताना पाय घसरून पडलेल्या पत्नीला वाचविताना पत्नीसह पतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना केज तालुक्यातील वाघेबाभूळगाव येथे घडली आहे.
पवारवाडी ता. केज येथील शेतकरी भास्कर विनायक पवार यांच्यासह त्यांची पत्नी अल्का पवार व मुलगा ऋषिकेश हे तिघे ५ डिसेंबर रोजी वाघेबाभूळगाव शिवारातील शेतात खुरपणी करीत होते. दुपारी ४:१५ वा.च्या सुमारास अल्का पवार या पिण्यासाठी पाणी विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरून विहिरीत पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे पती भास्कर पवार यांनी विहिरीत उडी मारून पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र अल्का पवार व भास्कर पवार या दोघा पती-पत्नीचा विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुग्रीव शंकर पवार यांच्या खबरी वरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा