परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

योगेश्वरी देवीच्या यात्रेला भाविकांचा महापूर :मोठी गर्दी

पुर्णाहुती महापूजेने श्री. योगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सवाची सांगता

योगेश्वरी देवीच्या यात्रेला भाविकांचा महापूर मोठी गर्दी



हजारो भाविकांनी घेतले योगेश्वरी देवीच्या पालखीचे दर्शन

अंबाजोगाई(प्रतिनिधी) :- अंबाजोगाई शहराचे ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या दि २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान संपन्न झालेल्या मार्गशीर्ष महोत्सवाची सांगता शुक्रवारी दुपारी होमहवन व पुर्णाहुती महापूजेने झाली. देवल कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे व  सुविद्य पत्नीच्या उपस्थितीत पुर्णाहुती व महापुजा संपन्न झाली. महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या होमात श्रीफळ टाकण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी करत देवीच्या दर्शनासाठी  भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अंबाजोगाई शहरासोबतच संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी माता श्री योगेश्वरी देवीची यात्रा गुरुवार दि ४ रोजी मोठ्या  सांस्कृतिक परंपरेनुसार  व उत्साहात संपन्न झाली. महापूजेनंतर आठ नऊ दिवस मंदिरात बसलेल्या आराध भक्त आपापल्या गावी जाण्यासाठी निघतांना मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

       गुरुवारी योगेश्वरी देवीच्या यात्रेला मोठी गर्दी झाली होती. यात्रेनिमित्त संध्याकाळी निघालेल्या योगेश्वरी देवीच्या पालखीचे देखील हजारो भाविकांनी दर्शन घेतले. श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत साजरा झाला. आज महोत्सवाची सांगता होमहवन व पुर्णाहुती महापूजेने झाली.  यावेळी योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव गिरधारीलाल भराडीया, विश्वस्त भगवानराव शिंदे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, विश्वस्त पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी, कमलाकर चौसाळकर, अ‍ॅड. शरद लोमटे, उल्हास पांडे, अक्षय मुंदडा, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, पूजा राम कुलकर्णी, शिरीष पांडे, योगेश्वरी देवीचे मानकरी, पुरोहित आदीजण उपस्थित होते. 

         या पुर्णाहुतीनंतर देवीच्या मंदिरात आराध बसलेल्या महिलांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.  अंबाजोगाई व पंचक्रोशीतील दर्शनासाठी भाविकांची मोठी संख्या मंदिर परिसरात झाल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा लागला. रात्री आठ वाजता योगेश्वरी देवीची पालखी मंदिरातून निघाली.  ही पालखी मंडीबाजार, पाटील चौक, भट गल्ली, जैन गल्ली, गौंड गल्ली मार्गे देशपांडे गल्लीतील देवघर, कुत्तर विहिर मार्गे पुन्हा मंदिरात पोहचली.  पालखी सोबत आराधी भजनी मंडळ, महिलांचे भजनी मंडळ, ढोलताशे, झांज पथक सहभागी झाले होते.पालखिमार्गावर व शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेली विद्युत रोषणाई शहर वासियांचे लक्ष वेधणारी ठरल्याचे दिसून येत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!