परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
एडस् बाधितांना वाळीत टाकू नका-डॉ. बालाजी फड
जागतिक एड्स दिन उत्साहात साजरा
परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)
शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयामध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.बालाजी फड, डॉ. कविता कराड, समुपदेशक शरद चव्हाण यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या स्वागतानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.व्ही.बी. कवडे यांनी प्रास्ताविक मांडले. त्यात त्यांनी जागतिक एड्स दिनाचा ऐतिहासिक व सामाजिक व आढावा घेतला. त्यानंतर डॉ.कराड मॅडम यांनी एडस् कशामुळे होतो ? त्याच्यावर कोणते उपचार उपलब्ध आहेत याविषयी सविस्तर सांगून त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांविषयी सविस्तर मार्गर्शन केले. याच विषयाला विस्तार देताना डॉ. बालाजी फड यांनी एड्स विषयक जनजागृती मुळे एड्स रुग्णात होत चाललेली घट ही समाधानाची बाब असली तरी हे संकट पूर्णपणे टळले नाही याची जाणीव करून दिली. एड्स रग्णांविषयी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन सोडून दिला पाहिजे. त्यांना वाळीत टाकण्यासारखे प्रकार होता कामा नयेत असेही त्यांनी त्यांच्या व्याख्यानात नमूद केले. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे श्री गालफडे, श्रीमती प्रियंका पोटभरे यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण फुटके तर आभार प्रा.डॉ. पी.व्ही गुट्टे यांनी मानले. याप्रसंगी प्रा डॉ.कचरे एस.व्ही, प्रा डॉ.गुळभिळे व्ही. डी. , प्रा डॉ. चव्हाण ए.एम. प्रा डॉ जोशी आर.एल. प्रा कोकाट एस.आर, प्रा डॉ मुंडे व्ही.आर, प्रा डॉ यल्लावाड आर.के, प्रा डॉ पाध्ये आर.आर, प्रा. शिंदे मॅडम, प्रा डॉ भांगे व्ही.जी. यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा