अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...
ना. पंकजा मुंडे यांची नांदेड महापालिका निवडणुकीच्या प्रभारीपदी नियुक्ती
मुंबई।दिनांक १९।
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची नांदेड महापालिका निवडणुकीच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज एका पत्राद्वारे ही नियुक्ती केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक 2025 नांदेड महानगरपालिका निवडणुकीकरिता आपली नियुक्ती करण्यात आल्याचे आज घोषित करण्यात आले.
आपण आपल्या संघटन कौशल्याने भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याकरिता सर्वांना सोबत घेऊन अथक परिश्रम कराल, असा मला पूर्ण विश्वास आहे असं पत्रात नमूद करून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा