परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
प्रधान सचिव सागर डोईफोडे यांचा फुलचंद कराड यांनी केला सत्कार
प्रधान सचिव (भारत सरकार) सागर डोईफोडे साहेब हे दोन दिवसाच्या परळी दौर्यावर आले असता त्यांनी फुलचंद कराड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी सागर डोईफोडे यांच्याशी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेत वैद्यनाथ दूध डेअरी प्रकल्पाविषयी श्री कराड यांनी माहिती दिली. तुप, दहि, दूध, ताक असे विविध उत्पादन करण्यात येत असल्याने श्री कराड यांनी सांगितले. दरम्यान, मा.श्री.सागर डोईफोडे व पीआरओ किशोर सानप यांचा फुलचंदराव कराड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पाटलोबा मुंडे, प्रदीप आंधळे, संदिपान आंधळे, माऊली फड, नाथराव केंद्रे, दादाराव चव्हाण, संभाजी केंद्रे, बंडापल्ले, सुरेश मुंडे, सचिनदा पवार, मुजावर शौकत, भक्तराम मुंडे, बारगजे, चंद्रप्रकाश मुंडे, अशोक चाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा