परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
ना. पंकजा मुंडे यांच्यामुळे परळी मतदारसंघातील रस्त्याला मिळाला १० कोटीचा निधी
ना. पंकजाताईंनी मानले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार
परळी वैजनाथ।दिनांक ११।
राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे परळी मतदारसंघातील रस्त्याच्या कामाला केंद्रीय रस्ते विकास योजनेंतर्गत दहा कोटी रूपयाचा निधी मिळाला आहे, निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना. पंकजाताईंनी केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ना. पंकजाताईंनी मध्यंतरी दिल्ली येथे भेट घेतली होती. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील विविध मागण्यांबरोबरच परळी मतदारसंघातील रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्र दिले होते, या पत्राची दखल घेऊन गडकरींनी केंद्रीय रस्ते विकास योजनेंतर्गत
अंबाजोगाई-मांडवा-मांडेखेल- नाथरा- कौडगाव रस्ता रामा-२३५ किमी ३८/२५५ वर पुलाचे बांधकाम करणे आणि कौडगाव घोडा गावाअंतर्गत लांबीमध्ये सिमेंट नालीचे बांधकाम करणे व संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे यासाठी दहा कोटी रूपयाचा निधी मंजूर केला आहे, लवकरच या कामाची प्रोसेस सुरू होवून काम सुरू होणार आहे. हा रस्ता व्हावा अशी ग्रामस्थांची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती, ही मागणी पूर्ण केल्याबद्दल ना. पंकजाताई यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा