परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर उसळणार अलोट गर्दी
मुंडे साहेबांना अभिप्रेत सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी करण्याचे ना. पंकजाताईंचे आवाहन
परळी वैजनाथ।दिनांक १०।
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर राज्याच्या कानाकोपर्यातून मोठी गर्दी उसळणार आहे. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे, माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक उपक्रम आयोजित करून आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी मुंडे साहेबांची जयंती साजरी करावी असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
ना. पंकजाताई मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरातील कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता गोपीनाथगड येथे आपण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षीपासून आपण आहे त्या ठिकाणी मुंडे साहेबांना अभिप्रेत असलेल्या जनसेवेच्या विविध उपक्रमांनी त्यांची जयंती साजरी करावी असे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने गेल्या वर्षी गावागावांमध्ये अशा पद्धतीने उत्साहात मुंडे साहेबांची जयंती साजरी झाली. याही वर्षी त्याच पद्धतीने गरजूंना मदत करून सामाजिक दायित्व घेऊन जयंती साजरी करावी. गेल्या दशकभरात आपण भव्य दिव्य कार्यक्रम केले मात्र मागच्या वर्षीपासून आपण ज्यांनी त्यांनी आपापल्या गावी मुंडे साहेबांच्या स्मरणार्थ मुंडे साहेबांना अभिप्रेत अशा पद्धतीने सामाजिक न्यायाचे कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन केले.
गरजूंना मदत करण्याचे आवाहन
------
यावर्षीही मुंडे साहेबांच्या जीवनाला शोभेल अशा पद्धतीची कामे करावीत, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, गरजूचे, आजारी व्यक्ती अशा सर्व व्यक्तींना मदत होईल अशा पद्धतीचे उपक्रम आपण घ्यावेत आणि मुंडे साहेबांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करा असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा