परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमवाडी मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर ;35 रक्तदात्यांनी केलं रक्तदान
परळी / प्रतिनिधी....
विश्वरत्न ,बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परळी येथील भिमवाडी मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील भिमवाडी मित्र मंडळाच्या युवकांनी रक्तदानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या रक्तदान शिबिरात 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले .रक्तदात्यांचा यावेळी सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन परळी संभाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मनोहर मुंडे ,सुनील कांबळे , महेंद्र रोडे,शरण मस्के, राहुल गोदाम , यशपाल मुंडे, तथागत धाटे, रवी मुळे ,सचिन रोडे, राहुल इंगळे, कपिल गायकवाड ,विजय व्हावळे ,सनी कसबे यांच्यासह भीमवाडी येथील युवक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा