परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

अखेर डॉ.भालचंद्र वाचनालय उघडले......

 नगर परिषद कार्यालय डॉ.भालचंद्र वाचनालयात स्थलांतरित 



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

      परळी नगर परिषद निवडणुकित मतदान झालेल्या मतदान यंत्रे नगर परिषद कार्यालयात ठेवण्यात आले आहेत. त्याठिकाणी निवडणूक व पोलिस प्रशासनाने गुरुवार ४ डिसेंबर रोजी नगरपालिकेची संपुर्ण इमारत सील केली होती. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचे दैनंदिन कामकाज डॉ.भालचंद्र वाचनालयाच्या इमारतीत हलवण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर सोमवार दि. ०८ डिसेंबर पासून डॉ.भालचंद्र वाचनालयाच्या इमारतीत नगर परिषद सर्व विभागातील कामकाज सुरू करण्यात आले. 

         नगर परिषद निवडणूक मतदान २ डिसेंबर रोजी शांततेत पार पडले. परळी शहरातील ८८ बुथवरील मतदान यंत्रे निकालापर्यंत ठेवण्यासाठी नगर पालिका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर स्ट्रॉगरुम तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी मतदान यंत्रे ठेवण्यात आली. मतदान यंत्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने २१ डिसेंबर पर्यंत या रुमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन ते पहाण्यासाठी पार्किंगच्या जागेत मॉनिटर बसवुन व्यवस्था करण्यात आली आहे. याच अनुषंगाने प्रशासनाने नगरपालिकेची संपूर्ण इमारत बंद केली होती. यामुळे सामान्य नागरीकांची घरपट्टी, नळपट्टी भरणे, पीटीआर संबंधी असलेली सर्व कामे खोळंबली होती. त्यामुळे नगर परिषद कार्यालय फाऊंडेशन स्कुल जवळ, नाथ चित्र मंदिर रोड वरील डॉ. भालचंद्र वाचनालयात हलविण्यात आले. नगरपालिकेच्या इमारतीत काही लोकांनी गोंधळ घालुन नगरपालिका कर्मचार्यांशी हुज्जत घातल्याने कार्यालय दैनंदिन कामासाठी बंद ठेवावे लागले होते. या तणावपूर्ण परिस्थितीत नागरीकांची कामे खोळंबु नयेत यासाठी सध्या रिकाम्या असलेल्या डॉ. भालचंद्र वाचनालयाच्या इमारतीत सोमवार दि. ०८ डिसेंबर पासून नगर परिषद कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता कार्यालयीन कामे सुरळीत होणार आहेत. नगर परिषद कार्यालय हे दि.२१ डिसेंबर पर्यंत हलविणार आहोत. त्र्यंबक कांबळे, मुख्याधिकारी, न.प. परळी यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!