परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट : सौ.संध्या दीपक देशमुख व दीपक देशमुख यांना तत्काळ संरक्षण देण्याची मागणी
बीड (प्रतिनिधी) – परळी वैजनाथ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्या दीपक देशमुख व त्यांचे पती माजी नगरसेवक दीपक रंगनाथ देशमुख यांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यांना तत्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.या संदर्भात माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यापूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांनी दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन सौ. संध्या देशमुख व दीपक देशमुख यांना संरक्षण देण्याची मागणी केली होती.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या परळी शहरात निवडणूक काळात होत व आहे असलेल्या कथित गैरप्रकारांमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कोणत्याही क्षणी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या २० डिसेंबर रोजी परळी शहरात पाच नगरसेवक पदासाठी मतदान प्रक्रिया होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे अत्यंत आवश्यक आहे.संभाव्य धोका टाळण्यासाठी सौ. संध्या दीपक देशमुख व दीपक रंगनाथ देशमुख यांना तत्काळ पोलीस संरक्षण द्यावे, परळी शहर पोलीस स्टेशचे अधिकारी व कर्मचारी संबंधित प्रकरणात दखल घेत नाही. दोन वेळा या प्रकरणी ते पोलीस स्टेशनला जाऊन आले. तसेच संबंधित कथित फोन रेकॉर्डिंगची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा