परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
नगर परिषद निवणुकीच्या सुधारित कार्यक्रमानुसार शेवटच्या दिवशी ३ जणांनी घेतली माघार
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी वैजनाथ नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार बुधवार दि. १० डिसेंबर रोजी ३ उमेदवारांनी माघार घेतली.
परळी वैजनाथ नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात नगरपरिषद निवडणूक मधील चार प्रभागातील जागाचा समावेश आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुक आयोगाच्या परिपत्रकानुसार आक्षेप आलेल्या जागांपैकी प्रभाग क्रमांक ३ मधील दोन्ही जागासह प्रभाग क्रमांक ९ अ, प्रभाग क्रमांक १४ ब या जागेवरची निवडणूक दि.२० डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम वेळापत्रक
१.नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक दि. १०/१२/२०२५, दुपारी ०३.०० वाजेपर्यंत २.आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देणे व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे दि. ११/१२/२०२५, ३.आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दि. २०/१२/२०२५, सकाळी ७.३० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत, ४.मतमोजणी व निकाल जाहीर करणे दि. २१/१२/२०२५, सकाळी १०.०० पासून ५.शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणे दि. २३/१२/२०२५ पूर्वी (कलम १९ मधील तरतुदीनुसार) असा आहे. तर परळी नगरपरिषद निवडणूक स्थगित झालेल्या नगर परिषद निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.त्यानुसार ४ ते १० डिसेबर दरम्यान एकूण ५ जणांनी माघार घेतली आहे. यात परळी वैजनाथ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता खालीलप्रमाणे उमेदवारांनी वैध नामनिर्देशनपत्र माघार घेतलेले आहे. त्याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे. 1.प्रभाग 14 ब- रामदासी कल्याणी रामदास -शिवसेना, प्रभाग 14 ब-पूजा अभिजीत शेंद्रे(अपक्ष) तर शेवटच्या दि. १० डिसेंबर रोजी प्रभाग 3 अ कुरेशी सुलतानाबी नजीर (अपक्ष), प्रभाग 3 अ कुरेशी मुस्तकिम रियाज कसाब (अपक्ष), प्रभाग 3 ब शेख यासमीन अजीम, (अपक्ष) वरीलप्रमाणे एकूण ०५ उमेदवारांची नामनिर्देशन माघार घेतली आहे.
परळी वैजनाथ नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम नुसार 4 जागेसाठी 19 उमेदवार, प्रभाग 3अ-4 उमेदवार, प्रभाग 3ब- 7 उमेदवार, प्रभाग 9अ-4 उमेदवार,
प्रभाग 14ब-4 उमेदवार असे आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधील दोन्ही जागासह ,प्रभाग क्रमांक 9 अ आणि प्रभाग 14 ब या 4 जागेवरची निवडणूक 20 डिसेंबर रोजी होणार आहे. मतदान २०/१२/२०२५, सकाळी ७.३० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत होणार आहे.
आज होणार चिन्ह वाटप
नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम नुसार 4 जागेसाठी 19 उमेदवार, प्रभाग 3अ-, प्रभाग 3ब-, प्रभाग 9अ-, प्रभाग 14ब या प्रभागातील उमेदवार यांनी गुरुवार दि.११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नगर परिषद कार्यालय येथे निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. तरी सर्वानी उपस्थिती राहावे अशी माहिती निवडणूक विभाग यांच्याकडून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा