परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
मांडवा येथील काळभैरवाचे फुलचंद कराड यांनी घेतले दर्शन
परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- परळी तालुक्यातील मांडवा येथील ग्रामदैवत श्री काळभैरवाचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्त शिवसेनेचे (शिंदेगट) महाराष्ट्र समन्वयक तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंदराव कराड यांनी मांडवा येथे जाऊन श्री काळभैरवाचे दर्शन घेतले.
श्री काळभैरवाच्या वार्षिक उत्सवानिमित्त गुरूवारी (दि.4) ह.भ.प.रामायणाचार्य रामेश्वर महाराज महाजन यांचे काल्याचे किर्तन झाले. या किर्तनात फुलचंदराव कराड यांनी सहभाग नोंदवला तसेच महाप्रसादाचा लाभही घेतला. यावेळी मांडवा गावचे माजी सरपंच सुंदर मुंडे, डॉ.संतोष मुंडे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रभाकर फड, डॉ.मधुकर आघाव, संदिपान आंधळे, मोहन साखरे, कृष्णा चाटे, अरूण दराडे, कृष्णा नागरगोजे, अरूण फड आदी उपस्थित होते. याप्रसंगी फुलचंदराव कराड यांचा श्री काळभैरवाची प्रतिमा देवून गावकर्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा