परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 वैद्यनाथ कॉलेज मध्ये  महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन




डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माणुसकीचे प्रेरणास्त्रोत - प्राचार्य डॉ. जगदीश जगतकर

परळी - वै.  प्रतिनिधी...

      जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ कॉलेज येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्राचार्य,डॉ. जगदीश जगतकर यांनी महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे व्ही जगतकर यांनी भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर हे माणुसकीचे प्रेरणास्त्रोत होते असे गौरव उद्गार या प्रसंगी काढले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे  प्राचार्य, डॉ. जगदीश जगतकर , उपप्राचार्य डी. के. आंधळे , उपप्राचार्य डॉ.  विनोद गायकवाड, उपप्राचार्य प्रा.हरीश मुंडे , यांची उपस्थिती होती.

        या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे व्ही जगतकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर प्रकाश टाकताना मानवतेचा संदेश संपूर्ण देशाला दिला. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेबांनी चौत्यभूमी परिसर वातावरण सद्भावना जागृत करत माणुसकीचा दिवा तेवत ठेवण्याचे कार्य केले असे सांगून    जगात अस एकही शिक्षणक्षेत्र नाही त्यात डॉ बाबासाहेब  आंबेडकर यांचे विचाराची शिकवण ही समता , बंधुत्व, न्याय आणि एकात्मतेचा या चार सुत्राने रक्ताचा थेंब न सांडता  माणुसकीसाठी वंचित व उपेक्षितांसाठी निर्भयपणे लढा देणारा विश्वरत्न महामानव बोधीसत्व म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणास्रोत म्हणून त्यांची ख्याती भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात झाली आहे. त्यांच्या विचारांची आज आपल्याला गरज आहे असेही मत याप्रसंगी प्राचार्य डॉ.जगतकर यांनी व्यक्त केले. 

          यावेळी  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी   पदार्थ विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख  प्रा. माधव रोडे ,एम सी व्ही सी विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. एम. एल . देशमुख यांनी अभिवांदनपर आपले विचार मांडले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. दिलीप गायकवाड, तर आभार प्रा.डॉ व्ही . बी. गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ.आरती कानपुरणे, श्री नवनाथ घुले, श्री प्रभाकर मुंडे यांच्यासह  सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!