परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळी येथील मीरा राऊत यांची विभागस्तरीय स्पर्धेत भरारी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक व अधिकारी कर्मचारी यांच्या विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धे मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात बीड जिल्यातील महिलांनी बाजी मारत एकूण सहा पदके मिळवली. यात परळी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरवट येथे कार्यरत असणाऱ्या शिक्षिका श्रीमती मीरा राऊत (विटेकर) यांचा समावेश असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. वैयक्तिक प्रकारात धावणे, गोळफेक, भलाफेक, लांबउडी यात सहा पदक या महिलांनी जिल्ह्याला मिळवून आणली.
भालाफेक प्रथम - श्रीमती. सावंत योजना कल्याणराव (ता. केज )गोळाफेक द्वितीय -श्रीमती. राऊत मीरा रामदास (ता. परळी) धावणे द्वितीय -द्वितीय श्रीमती उनवणे सिमा बळीराम (ता. अंबाजोगाई ), धावणे तृतीय -श्रीमती राठोड संगीता बळीराम (ता. माजलगाव )गोळफेक तृतीय -श्रीमती भायगुडे ताई उद्धवराव (ता. बीड,) लांबउडी उत्तेजनार्थ -जायभाये सुनीता श्रीमंतराव ता. (ता. बीड )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा