अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...
प्रा. श्री व्ही. टी. गित्ते यांना गणित विषयात पीएच्. डी. प्रदान
परळी वैजनाथ : नागनाथआप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालय परळी वैजनाथ येथील प्रा. व्यंकट तातेराव गित्ते यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ. संभाजीनगर यांच्याकडून 12 डिसेंबर 2025 रोजी गणित या विषयात पीएच्. डी. प्रदान करण्यात आली आहे.
श्री. गित्ते यांनी "CONVECTION AND MASS TRANSFER EFFECTS ON ROTATING FLOW AND GRAVITY MODULATION" या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. त्यासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून उत्तमचंद बगडिया महाविद्यालय, रिसोड येथील प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी सर होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गणित विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. दीपक पाचपट्टे सर, प्रा. डॉ. रवींद्र लहुरीकर सर व गणित अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. जगदीश ननवरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. बाह्य परीक्षक म्हणून पुणे येथील विश्वकर्मा विद्यापीठाचे गणित विभाग प्रमुख प्रा. डॉ. जगदीश तावडे सर उपस्थित होते. या यशाबद्दल परळी वैजनाथ येथे त्यांच्या शिक्षक व प्राध्यापक मित्र मंडळाकडून त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कार समारंभास श्री. सुरेशनाना फड, श्री प्रदीप खाडे सर, आदर्श शिक्षक श्री अंकुश फड गुरुजी, श्री बुरांडे सर, श्री दराडे साहेब, श्री संतोष सांगळे सर, मु. अ. श्री तारे सर, प्रा. दराडे सर, प्रा. डॉ. सूर्यकांत गित्ते सर, प्रा. डॉ. एल. आर. मुंडे सर, मंजुळदास भिसे सर, श्री गोविंद साठे सर, श्री रामेश्वर राठोड सर, आदर्श शिक्षक कांदे गुरुजी, श्री भास्कर आंधळे सर, मधुकर जोगदंड सर, श्री गोविंदराव ढाकणे, घुले सर, श्री सायस मुंडे सर, श्री रघुनाथ मुंडे सर, श्री गवते पाटील, श्री जगन्नाथ वणवे, श्री रंगनाथ काटके, श्री अरुण गित्ते, श्री गोविंद तातेराव गित्ते, श्री एकनाथ तगरे, श्री विजय चंडोल इ. उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा