परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

जिरेवाडी च्या श्रीसोमेश्वर मंदिरातील चोरी प्रकरण....

 देवाच्या घरात चोरी करणाऱ्या पाच जणांना पोलीसांनी पकडले : 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     दिनांक 25/11/2025 रोजी रात्री 10.30 वा.ते दिनांक 26/11/2025 रोजी सकाळी 05.00 वा.च्या दरम्यान जिरेवाडी ता. परळी वैजीनाथ जि. बीड येथील सोमेश्वर संस्थानाचे मंदिराचे सभागृहाचे गेटचे कुलूप तोडुन आत प्रवेश करुन मंदिराचे गाभा-यातील दानपेटीचे कुलुप तोडुन अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन मंदिरातील दानपेटीतील रक्कम अंदाजे 30,000/- रुपये व मौल्यवान दागीने चांदीची चंद्रकोर, एक ग्राम वजनाचे सोन्याचे टाक चोरले होते. त्यावरुन फिर्यादी पाटलोबा सिताराम मुंडे वय 45 रा.जिरेवाडी सोमेश्वर संस्थान जिरेवाडी समिती उपाध्यक्ष रा. जिरेवाडी ता. परळी वैजीनाथ यांच्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन परळी ग्रामीण गुरनं. 499/2025 कलम 331(4), 305 (अ) बीएनएस प्रमाणे दिनांक 26/11/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

     नमुद गुन्हयाचा बारकाईने तपास करुन आणि गोपनिय बातमीदारांकडुन सदर गुन्हयातील आरोपींबाबत अधिक माहिती प्राप्त करुन घेऊन 1) वैभव विष्णु कोकरे वय 19 रादौनापूर तालुका परळी वैजीनाथ, 2) बालाजी बबन थाटकर वय 28 रा. समतानगर अंबाजोगाई, 3) महादेव बाबुराव माने, वय 22 रा.वानटाकळी ता. परळी वैजीनाथ, 4) छगन नानाजी खैरमोडे वय 32 वर्षे, रा. रविवारपेठ, परळीवेस, भोईगल्ली अंबाजोगाई, 5) ऋषीकेश दगडु माने वय 22 वर्षे रा.वानटाकळी तालुका परळी वैजीनाथ यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींच्या ठावठिकाण्याबाबत माहिती काढुन नमुद आरोपी यांना दिनांक 04/12/2025 रोजी सदर गुन्हयात अटक करुन त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल आणि त्यांनी मंदिरातुन चोरलेली चांदीची चंद्रकोर, एक ग्राम वजनाचे सोन्याचे टाक, 1700/- रुपये त्यांच्याकडुन जप्त करण्यात आलेले आहेत. सदर गुन्हयातील उर्वरीत रोख रकमेसंबंधाने आणि त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले हत्यार याबाबत त्यांच्याकडे तपास करण्यासाठी त्यांची मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैजीनाथ यांचे न्यायालयाकडुन दिनांक 08/12/2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर करुन घेण्यात आली आहे.

     सदर गुन्हयाच्या तपासात नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक बीड,सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, श्रीमती. चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई, वेंकटराम, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उप विभाग अंबाजोगाई यांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन पोनि.एम.ए. सय्यद, सपोनि मेंडके, पोउपनि निमाणे, पोउपनि. शेख, सफौटोले, पोहवा हरगांवकर, पोहवा /परजने, पोअं.घोडके, पोअं. केदार, चापोअं. वाघमारे पोलीस स्टेशन परळी ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघडकिस आणला असुन सदर गुन्हयाचा तपास पोउपनि निमोणे हे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!