परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळीत प्लॉटींग मालकाकडुन पंधरा फुटाच्या नालीवर अतिक्रमणाचा प्रयत्न ; नागरिकांच्या रोषानंतर न.प.ला जाग
परळी (प्रतिनिधी)
परळी शहरातील नेहरू चौक भागात असलेल्या जुन्या प्रभात टॉकीजच्या जागेवर राहुल अरुण टाक हे प्लॉटींगचा व्यवसाय करत असुन यासाठी त्यांनी रस्त्यालगत असलेल्या पंधरा फुटाची नाली बुजवुन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या भागातील नागरीकांनी यास विरोध केला.न.प.प्रशासनाकडुन सदरील अतिक्रमण काढुण घेण्याच्या सुचना टाक यांना दिल्या आहेत.
परळी शहर व परिसरात प्लॉटींगचा व्यवसाय करणारे राहुल अरुण टाक हे नेहरू चौक भागात असलेल्या जुन्या प्रभात टॉकीजच्या जागेवर प्लॉटींग काढत आहेत.या जागेला असलेला मुख्य रस्ता सोडुन जागेच्या शेजारी असलेल्या पधरा फुटाच्या नालीत दगड व पाईप टाकुन त्या नालीवर बांधकाम करत अतिक्रमण सुरु होते.यामुळे पंचवटी नगर,स्नेह नगर,संत सोपानकाका मंदिराकडे जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होणार असुन बसवेश्वर कॉलनी भागातुन येणारे पावसाचे पाणी अडले जावुन परिसरातील घरांमध्ये घुसण्याच्या भितीमुळे नागरीकांनी या अतिक्रमणास विरोध करत ही बाब नगरपालिका प्रशासनाच्या समोर मांडली.न.प.कर्मचार्यांनी सदरील अतिक्रमणाची पहाणी करुन सदरील अतिक्रमण तात्काळ काढुन टाकण्याच्या सुचना केल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा