अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...

इमेज
  बीड जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी - पोलीस अधीक्षकांनी दिले सक्त निर्देश बीड : पोलीस अधीक्षक नवनीत कावत, बीड जिल्हा यांच्याकडून सर्व नगरपरिषद उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना सक्त निर्देशित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी असुन कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे असे पोलीस अधीक्षकांनी  सक्त निर्देश दिले आहेत.        आज होणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली, विजयी जल्लोष, घोषणा, फटाके फोडणे किंवा जमाव जमविण्यास पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.तसेच  जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून, सदर आदेश दि. 19/12/2025 रोजी रात्री 00.01 वा. पासून ते दि. 02/01/2026 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू राहतील. विनापरवाना मिरवणूक काढणे, जमाव करणे, रस्ते अडविणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असा कोणताही प्रकार पूर्णतः प्रतिबंधित आहे.         आदेशाचे उल...

निवडणूक प्रभागातील १५ मतदान केंद्रावर राहणार सीसीटीव्हीची नजर

 परळी नगर परिषद निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार उर्वरित प्रभागातील जागासाठी आज मतदान 




निवडणूक प्रभागातील १५ मतदान केंद्रावर राहणार सीसीटीव्हीची नजर

आज होणाऱ्या मतदानासाठी प्रभागातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा- निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

        राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार परळी वैजनाथ नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उर्वरित नगर परिषदेच्या 3 प्रभागातील ४ नगर सेवकपदासाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. या जागासाठी शनिवार दि. २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ४ जागेसाठी 14, 238 मतदार मतदान हक्क बजावणार आहेत. दुबार मतदान असणाऱ्याना करता येणार एकाच ठिकाणी मतदान व हमीपत्र सादर करावं लागणार आहे. तर दुबार मतदान केल्यास कारवाई होणार आहे. तर प्रभागातील मतदान केंद्रावर सिसिटीव्ही निगरानी राहणार आहे. तरी आज होणाऱ्या मतदानासाठी उर्वरित  प्रभागातील मतदार बांधवानी लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी केले आहे.  

           मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील आदेश क्र. रानिआ/सुनिका/नप/प्र.क्र.१४/का-६, दिनांक २९/११/२०२५ रोजीच्या आदेशान्वये नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात व्यथित उमेदवाराने जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्यात आलेले होते, अपीलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून दिनांक २२/११/२०२५ नंतर म्हणजेच दिनांक २३/११/२०२५ किंवा तद्नंतर देण्यात आलेला आहे अशा नगरपरिषद सदस्य पदांच्या त्या जागेवरील दिनांक ०४/११/२०२५ रोजीच्या कार्यक्रमानुसार घेण्यात येणारी निवडणूक स्थगित करून सुधारित निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे.त्यानुसार, महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ यातील नियम ४ आणि ५ व इतर सर्व अनुषंगिक तरतुदीप्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन , विवेक जॉन्सन (भा.प्र.से) जिल्हाधिकारी बीड या सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ १ मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या संबंधित प्रभागातील जागेकरिता घेण्यात येणा-या सार्वत्रिक निवडणूकीच्या संबंधात पूढील नेमणुका व तारखा निश्चित करीत आहे. परळी वैजनाथ नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार आज मतदान होणार आहे. 

                  परळी वैजनाथ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता दिनांक 02.12.2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर प्रभाग क्र. 03 अ व ब, प्रभाग क्र. 9 अ व प्रभाग क्र. 14 ब करिता दिनांक 20.12.2025 रोजी मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्या ठिकाणी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  नगरपरिषद कार्यालय येथून मतदान साहित्य वाटप करण्यात आले. उर्वरित जागासाठी १५ मतदान केंद्रांसाठी लागणाऱ्या साहित्य वाटप करून पूर्णपणे सज्ज झाले आहेत. यामुळे मतदान दिवशी कोणतीही अडचण येऊ नये, याची विशेष खबरदारी प्रशासनाने घेतली आहे.  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्गदर्शन, तसेच इतर अधिकाऱ्यांच्या कामकाज व  नियोजनामुळे परळी वैजनाथ नगरपरिषद निवडणुकीतील उर्वरित जागासाठीच्या मतदानाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मतदान केंद्रावर कुठेही गोंधळ होऊ नये, पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया राबवली जावी, यासाठी मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.  कुठल्याही मतदान केंद्रावर किंवा मतमोजणी केंद्रावर प्रवेशिकेशिवाय प्रवेश करता येणार नाही. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट मतदान केंद्रावरील मतदान कक्षाजवळ जाऊन पहाणी किंवा छायाचित्रे, छायाचित्रण करता येणार नाही. मतदार मतदान करतानाचे छायाचित्र किंवा छायाचित्रण पुरेशा अंतरावरुन करणे बंधनकारक असेल. ते करतानाही मतदानाच्या गोपनीयतेच्या हक्काचे उल्लघंन होता कामा नये.  मतदान केंद्रा बाहेरील फोटो किंवा व्हडिओ काढावा. मतदान केंद्रावर यादीतील अनियमितता व बाहेर गावी असणारे मतदार यांचे नावाने बनवट ओळखपत्र तयार करण्याचा प्रकार राखण्यासाठी प्रशासनाने कडक नियम लागू केले आहेत. बनावट दस्ताऐवज वापरणाऱ्यावर  कठोर कारवाई  होणार आहे. त्यामुळे मतदानासाठी वैध ओळखपत्र बंधनकारक आहे. दुबार मतदान असणाऱ्याना करता येणार एकाच ठिकाणी मतदान व हमीपत्र सादर करावं लागणार आहे. तर दुबार मतदान केल्यास कारवाई होणार आहे. २१ डिसेंबरला नगर परिषद कार्यालयातील सभागृहात मतमोजणी पार पडणार असल्याने त्या ठिकाणीही निवडणूक विभागाकडून काटेकोर तयारी सुरू आहे. मतमोजणीच्या दिवशी परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, मतमोजणी प्रक्रियेसाठी स्वतंत्र कक्षांची निर्मिती पूर्ण झाली आहे.  

         तरी आज होणाऱ्या मतदानासाठी उर्वरित  प्रभागातील मतदार बांधवानी लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!