परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 श्री.काळभैरव देवस्थान यात्रेला उत्साहपूर्ण सुरुवात 




आज पालखी सोहळा , काल्याचे कीर्तन व महाप्रसादचा लाभ घ्यावा 

मांडवा (परळी वैजनाथ) प्रतिनिधी :- श्री काळभैरव देवस्थान मांडवा यात्रेचा शुभारंभ 27 नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात झाला. या यात्रेनिमित्त सात दिवसांच्या भव्य कथेचे आयोजन करण्यात आले होते. नामवंत कीर्तनकारांनी दररोज उपस्थित राहून भागवत कथा,कीर्तन, प्रवचन आणि भक्तिसंगीताचा आनंद भक्तांना दिला. सात दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमांना गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अन्नदान व दानधर्मातही सहभागी होऊन परंपरा जपली.


उद्या पासून मार्गशीर्ष पौर्णिमे निमित्त श्री काळभैरव देवस्थानचा मुख्य यात्रा उत्सव पार पडणार आहे. यानिमित्त देवाची महापूजा, शृंगार आरती, महाप्रसाद असे धार्मिक विधी होणार असून पालखीची भव्य मिरवणूक गावभरातून निघणार आहे. संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज ह.भ.प.रामायणाचार्य रामेश्वर महाराज महाजन यांचे दुपारी १ ते ३ काल्याचे कीर्तन होईल व महाप्रसाद आयोजन केले आहे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे .

यात्रेचे आणखी एक आकर्षण म्हणजे 5 डिसेंबर रोजी आयोजित भव्य कुस्ती दंगल. या दंगलींमध्ये नामवंत मल्ल व पैलवान हजेरी लावून कुस्तीची शान वाढवणार आहेत. हजारो प्रेक्षक या दंगलींचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

यात्रेनिमित्त आंध्र प्रदेश , तेलंगणा, कर्नाटक येथील मथुरालाभण समाजाचे भक्त मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी मांडव्यात दाखल झाले आहेत. अनेक भक्त दोन दिवस मुक्कामी राहून पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतात . तसेच मांडवा व परळी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहात असून यात्रेला मोठी गर्दी होत आहे. श्री काळभैरव देवस्थान यात्रा मांडवा गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे दर्शन घडविणारी ठरत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!