परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
लक्ष्मणराव घवाळकर यांना बंधू शोक ; रामराव विश्वनाथराव घवाळकर यांचे निधन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-येथील प्रसिद्ध मोटार तज्ञ लक्ष्मणराव घवाळकर यांचे बंधू व सध्या माजलगाव येथील रहिवासी रामराव घवाळकर यांचे मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराने शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 72 वर्षे होते.
येथील पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून सेवा बजावली होती व सध्या ते सेवानिवृत्तीचे जीवन जगत होते. अत्यंत कडक शिस्तीचे म्हणून त्यांची ख्याती होती.प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबई येथील कोकिळाबेनस इस्पितळात गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू होते त्यांच्या पश्च्यात पत्नी, चार भाऊ, सहा बहिणी,तीन मुले, सुना व नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल परळी व माजलगाव भागामध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची अंत्ययात्रा विद्यानगर येथून निघणार असून त्यांच्या पार्थिवावर शनिवार दिनांक 13 रोजी दुपारी दोन वाजता परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा