परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने राजकारणातील ऋषीतुल्य व सात्विक नेता हरवला !
ना.पंकजाताई मुंडेंनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत कुटुंबीयांचं केलं सांत्वन
लातूर, प्रतिनिधी.......
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने राजकारणातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व व राजकारणातील एक सात्विक नेता हरवला असल्याचे शोकसंवेदना ना.पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली.
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या निधनाबद्दल शोक संवेदना व्यक्त करताना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, राजकारणातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व व राजकारणातील एक सात्विक नेता आज हरवला आहे.शिवराज पाटील चाकूरकर हे आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले. देश पातळीपर्यंत अत्यंत सन्मानाने आणि स्वाभिमानाने सात्विक असं राजकारण त्यांनी केलं. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो अशा शब्दात ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा